कुरकुरीत, झणझणीत आणि घरच्या घरी सहज बनवता येणारे हे काप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. यासाठी लागणारं साहित्यही अगदी साधं आहे.
अस्सल सोलापुरी चव अन् पोटभर जेव! पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त 20 रुपयांत दालचा, लोकेशन काय?
रताळ्याचे काप बनवण्यासाठी साहित्य:
2 मध्यम आकाराची रताळी, अर्धा वाटी शाबुदाण्याचे पीठ,सेंद्रिय सैंधव मीठ (चवीनुसार) तूप किंवा शेंगदाण्याचं तेल तळण्यासाठी हे साहित्य लागेल.
advertisement
रताळ्याचे काप बनवण्याची कृती
रताळी सोलून पातळ गोल काप कापून घ्या.
मध्यम शिजवून घ्या.
तव्यावर थोडं तूप/तेल गरम करा.
रताळ्याच्या कापाच्या दोन्ही बाजूला शाबुदाण्याचे पीठ लावा.
तव्यात सोडून रताळ्याचे काप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
आपले गरम गरम कुरकुरीत काप उपवासासाठी तयार आहेत. उपवासाच्या पथ्यावर पडणारी, झटपट तयार होणारी आणि चवीलाही समृद्ध अशी ही रेसिपी, यंदा नक्की ट्राय करा. सणाच्या गडबडीत असा झटपट आणि स्वादिष्ट पर्याय खूपच उपयोगी पडतो.