खुरमा बनवण्यसाठी लागणारे साहित्य
दोन वाटी मैदा, एक वाटी तूप, गरजेनुसार पाणी, चाचणीसाठी दीड वाटी साखर आणि तेल हे साहित्य आवश्यक आहे.
बेसनचे लाडू बिघडतात? या सिक्रेट टिप्स वापरा आणि दिवाळी गोड करा
खुरमा बनवण्यसाची कृती
खुरमा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका परातीमध्ये दोन वाटी मैद्याचे पीठ घेऊन त्यामध्ये तूप हे टाकावं. हे मिश्रण आधी छान मिक्स करून घ्यावं. त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं घट्ट मळून घ्यावं. जास्त पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही मिडीयममध्ये तुम्ही हे पीठ मळून घ्या. त्यानंतर हे पीठ पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यावं. हे पीठ छान मुरल्यानंतर एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी. पोळी लाटल्यानंतर चाकूच्या साह्याने आडव्या रेषा आणि उभ्या रेषा मारून त्याचे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यावेत. नंतर गॅस वरती कढई ठेवून त्यात तेल टाकून तेल तापल्यानंतर बारीक बारीक तुकडे त्यात टाकून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा. खुरमे छान तळून घ्यायचे आहेत.
advertisement
रोजच्या साखरेचा वापर न करता बनवा झटपट लाडू, पाहा ही रेसिपी
नंतर चाचणी तयार करून घ्यावी. चाचणी करण्यासाठी दोन वाटी मैदा घेतला आहे तर दीड वाटी साखर घेऊन थोडे पाणी टाकून चाचणीही छान तयार करून घ्यायची आहे. चाचणी झाल्यानंतर यामध्ये तयार केलेले खुरमे टाकून ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत. या खुरम्याना संपूर्ण चाचणी लागेपर्यंत पाकात ठेवून द्यायचे आहेत. खुरमे नंतर एका छान डिशमध्ये घेऊन तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. अत्यंत सोपी अशा पद्धतीची रेसिपी नक्की तुम्ही यंदाच्या दिवाळीला घरी ट्राय करा, असं सिताराम साबू यांनी सांगितलं.