TRENDING:

आरोग्याचा खजिना, झटपट बनवा तांदुळजा भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

तांदुळजा ही बाराही महिने मिळणारी पालेभाजी आहे. तिच्यात पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदाने ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठ मानली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असणारी भाजी म्हणजे तांदुळजा. तांदुळजा ही बाराही महिने मिळणारी पालेभाजी आहे. तिच्यात पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदाने ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठ मानली आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पालेभाजी नक्की खाल्ली गेली पाहिजे. आज आपण या भाजीची रेसिपी बनवणार आहोत. अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात झटपट बनणारी रेसिपी आहे. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
advertisement

तांदुळजा भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 

तांदुळजा भाजी, तेल, मोहरी, जिरे, हिरवी मिरची, लसूण, हिंग, शेंगदाणे, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.

ब्रोकोली की फुलकोबी, कोणती भाजी जास्त हेल्दी? वजन कमी करण्यासाठी काय खावं?

तांदुळजा भाजी कृती

सुरुवातीला तांदळीची भाजी नीट निवडून घ्यावी. त्यानंतर ती 2–3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी, जेणेकरून माती किंवा घाण पूर्णपणे निघून जाईल. धुतलेली भाजी चाळणीत ठेवून अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळू द्यावे. कढईत आवश्यकतेनुसार तेल घालून ते गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकून ती तडतडू द्यावी. त्यानंतर जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण घालून फोडणी द्यावी.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

लसूण हलका सोनेरी रंगाचा झाला की त्यात थोडासा हिंग घालून सर्व साहित्य नीट परतून घ्यावे. यानंतर निथळलेली तांदळीची भाजी कढईत घालावी आणि मध्यम आचेवर परतायला सुरुवात करावी. सुरुवातीला भाजीचे प्रमाण जास्त दिसेल, मात्र परतताना वाफ निघत गेल्याने तिचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. भाजी साधारण निम्म्यावर आली की चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट मिसळा. भाजी पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यावी. भाजी पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करावा. तयार झालेली तांदळीची भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, तसेच वरण-भातासोबतही खाण्यास अतिशय चविष्ट लागते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्याचा खजिना, झटपट बनवा तांदुळजा भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल