शेपूच्या वडीचे साहित्य
शेपूची वडी बनवण्यासाठी घरातील साहित्य आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी, तांदळाचे पीठ, बेसन पीठ हे साहित्य लागेल. तसेच हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, धने पूड, जिरेपूड, लिंबू, तेल, तीळ आणि ओवा हे सुद्धा आवश्यक आहे.
कारल्याची भाजी खायला आवडतं नाही? मग ‘या’ पद्धतीनं बनवा टेस्टी चिप्स
advertisement
कशी बनवायीच शेपूची वडी?
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात शेपूची बारीक चिरून घेतलेली भाजी घ्या. त्यात तांदळाचे पीठ, बेसन, हिरव्या मिरचीची पेस्ट, आले-लसूणची पेस्ट, तीळ, ओवा, चवीनुसार हळद, मीठ, धने, जिरेपूड हे एकत्र करून भिजवून गोळा बनवून घ्यायचा आहे. गरज असल्यास आणखी बेसन किंवा गरज वाटल्यास पाणीही ऍड करू शकता. गोळा भिजवून झाल्यानंतर दोन समान भागात लांबुळके गोळे बनवून दोन्ही साईडला चपटे करून घेऊन कढईत पाण्यावर चाळणी ठेवून वाफवून घ्यायचे आहे. जेणेकरून वडी पाडण्यास सोपे जाईल.
ओल्या हरभऱ्यापासून घरीच बनवा स्वादिष्ट कचोरी; 'ही' सोपी रेसिपी पाहाच
हे गोळे 15 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर चाकूला तेल लावून वडी पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तव्यावर तेल घालून शालो फ्राय करून घ्यायचे आहे. आता शेपूच्या भाजीच्या चविष्ट वड्या खाण्यासाठी तयार आहेत.
आपण मेथी, पालक, कोथिंबीरीची वडी ट्राय करून पाहिली असेल. या वड्या चवीला भन्नाट लागतात, पण आपण शेपूची वडी जर करून बघितली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. जर घरात शेपूची जुडी असेल तर, त्याची भाजी न करता वडी ट्राय करायला हरकत नाही. शेपूची वडी करण्यासाठी जास्त साहित्य किंवा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ही रेसिपी झटपट तयार होते.