TRENDING:

घरगुती पद्धतीनं बनवा कोष्टी डाळ-कांदा, विदर्भातील खास रेसिपी, Video

Last Updated:

विदर्भ स्टाईल कोष्टी स्पेशल झणझणीत डाळ कांदा घरगुती पद्धतीने कसा बनवायचा? पाहा रेसिपी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 5 ऑक्टोबर: विदर्भाची खाद्यसंस्कृती अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. विदर्भातील मराठा पाटोडी, सावजी, यासह डाळ-कांदा देखील प्रसिद्ध आहे. विदर्भ कोष्टी डाळ-कांदा अनेक खवय्यांना भूरळ घालतो. त्यामुळे शाकाहारी जेवणात या पदार्थाला मोठी पसंती असते. हाच विदर्भ कोष्टी चमचमीत डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कसा बनवायचा हे वर्धा येथील गृहिणी कीर्ती अलोणे यांनी सांगितली आहे.
advertisement

डाळ-कांदा रेसिपीसाठी साहित्य

विदर्भ कोष्टी डाळ-कांदा रेसिपी ही घरगुती साहित्यातूनच तयार करता येते. त्यासाठी प्रामुख्याने 1/3 वाटी भिजवलेली चना डाळ, अंदाजे अर्धा किलो कांदे, आलं लसूण पेस्ट घ्यावी लागेल. तसेच चवीनुसार मीठ, हळद, तिखट, थोडा गरम मसाला, धने पावडर, जीरे पावडर, तमालपत्र, तेल 1 वाटी, धने आणि खोबरे पेस्ट, कोथिंबीर आदी पदार्थही आपश्यक आहेत. या साहित्यातून 4-5 जणांना पुरेल इतकी भाजी तयार होईल. त्यामुळे तुम्ही गरजेनुसार साहित्य कमी जास्त करू शकता, असे अलोणे सांगतात.

advertisement

नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? नवरात्रीत ट्राय करा उपवासाचे चाट

कसा बनवायचा डाळ-कांदा?

सर्वप्रथम 5-6 तास चणा डाळ भिजवून घ्यायची आहे. कढई मध्ये तेल गरम करून घ्यायचे. गरम तेलात बारीक चिरलेला कांदा अ‍ॅड करून कांदा शिजायला ठेवावा. कांदा शिजण्यासाठी 10-12 मिनिटाचा वेळ लागतो. कांदा शिजल्यानंतर त्यात धने खोबऱ्याची पेस्ट आणि थोड्या वेळाने आलं लसूण पेस्ट अ‍ॅड करावी. दोन्ही पेस्ट चांगल्या शिजल्यानंतर आधी धने-जिरे पावडर, घरी उपलब्ध असलेला मसाला अ‍ॅडकरून मिक्स करावे. त्यानंतर हळद आणि तिखट अ‍ॅडकरून चांगले शिजू द्यावे. (मीठ लगेच घालू नये कारण मिठामुळे डाळ लवकर शिजणार नाही)

advertisement

आरोग्यवर्धक कारल्यापासून घरीच तयार करा चिप्स; पाहा रेसिपी पद्धत

अंदाजे 2 मिनीटांनी गरम पाणी अ‍ॅड करा. आता भिजवून ठेवलेली डाळ अ‍ॅड करून पंधरा मिनिटे शिजण्यासाठी ठेवावे. डाळ चांगली शिजल्यानंतर मीठ अ‍ॅड करा. पुन्हा थोडा वेळ शिजल्यानंतर आता भाजीला चांगली तरी आलेली दिसेल. भाजीवर कोथिंबीर घालून आता विदर्भ कोष्टी स्टाईल झणझणीत डाळ- कंदा खाण्यासाठी तयार आहे. भाजीची तर्री कांदा आणि मसाले चांगले शिजण्यावर आहे.

advertisement

हा चविष्ट पदार्थ अनेकांचा फेव्हरेट देखील आहे. डाळ कांद्याची भाजी घरगुती पद्धतीने बनवता येते. त्यामुळे तुम्ही देखील ही झणझणीत विदर्भ स्टाईल डाळ कांदा रेसिपी नक्की ट्राय करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
घरगुती पद्धतीनं बनवा कोष्टी डाळ-कांदा, विदर्भातील खास रेसिपी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल