ठाणे: दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर वाढत आहे. या काळात आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. अनेकजण या काळात विविध प्रकारचे सूप पिण्याला प्राधान्य देतात. यात टोमॅटो सूपला विशेष पसंती असते. हिवाळ्यातील थंड वातावरणात टोमॅटो सूप आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपणही आपल्यात अगदी 10 मिनिंटात आरोग्यदायी टोमॅटो सूप बनवू शकता. याचीच रेसिपी ठाण्यातील गृहिणी छाया शिंदे यांनी सांगितली आहे.
advertisement
टोमॅटो सूपसाठी लागणारे साहित्य
टोमॅटो सूपसाठी आपल्या घरात सहज उपलब्ध असणारं साहित्यच आवश्यक असतं. त्यासाठी बारीक चिरलेले चार ते पाच छोटे टोमॅटो, बारीक चिरलेला अद्रक, एक मिरची, टोमॅटो केचप एक चमचा, एक ग्लास पाणी, काळीमिरी पूड आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य लागेल.
50 पेक्षा जास्त प्रकार, सुंदर इनडोअर प्लांट मिळण्याचं दादरमधील बेस्ट ठिकाण, VIDEO
टोमॅटो सूप कृती
सर्वात प्रथम टोमॅटो, अद्रक, मिरची बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात बटर टाका. बटर वितळल्यावर त्यामध्ये अद्रकचे तुकडे आणि एक मिरचीचा तुकडा फ्राय करून घ्या. त्यानंतर कढईत बारीक चिरलेला टोमॅटो टाका. 2 मिनिटांनी त्यात एक ग्लास पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, काळी मिरीपूड आणि टोमॅटो केचप घाला. पुन्हा व्यवस्थित पाच मिनिटं उकळी येऊ द्या. टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर. एका चाळणी मध्ये काढून व्यवस्थित गाळून घ्या. आता टोमॅटोचा वरचा राहिलेला भाग टाकून देऊन त्याचा सूप पुन्हा एकदा कढईत ओता आणि दोन मिनिटं गरम करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही गरमागरम टोमॅटो सूप 10 मिनिटांच्या आत तयार करू शकता.
ऐन दिवाळीत कोकणचा हापूस बाजारात, कसं झालं शक्य? पहिल्या पेटीला किती भाव?
दरम्यान, अगदी 10 मिनिटांत बनणारं टोमॅटो सूप अत्यंत आरोग्यदायी आहे. तसेच चवीला सुद्धा चविष्ट असते. बऱ्याचदा रुग्णांनाही हे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच लहान मुलांना देखील हे सूप देण्यास सांगितलं जातं. तेव्हा अगदी मोजक्या साहित्यातून तुम्ही घरीच हे सूप ट्राय करू शकता.