रिलेशनशिपचा नवीन प्रकार DADT. वर्किंग कपल्स, लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लॉन्ग-डिस्टन्स कपल्सना हा ट्रेंड खूप आवडतो. याचा फूल फॉर्म Do Not Ask, Do Not Tell. याचा अर्थ 'विचारू नका, सांगू नका', तरी तुम्हाला यावरून या नात्याचं कोडं उलगडं नसेल. त्यामुळे याबाबत आपण तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया.
रिलेशनशिप एक्सपर्ट प्रियांका श्रीवास्तव म्हणतात की, आजकाल लोक नातेसंबंधात राहू इच्छितात पण त्यांच्या जोडीदारापासूनही त्यांचं वैयक्तिक जीवन खाजगी ठेवण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणीही हस्तक्षेप करू नये असं वाटतं. म्हणूनच ते 'तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारू नका आणि मी तुम्हाला काहीही सांगणार नाही' या तत्त्वाचे आहेत. त्यांना नात्यात जबाबदारी नको आहे. DADT नातं विश्वास आणि स्वातंत्र्यावर आधारित आहे.
advertisement
स्वातंत्र्याला प्राधान्य
खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये जोडीदाराला मोकळं सोडलं जातं. जोडप्यांना एकमेकांना बांधून ठेवायचं नसतं. DADT चा पाया स्वातंत्र्यावर आधारित आहे. तरुणांना आता बंधनात राहायचं नसतं. त्यांना नातेसंबंधात मालकी हक्काचं राहणे आवडत नाही. यामुळे त्यांचं नातंही मजबूत होतं. विशेषतः जे लोक लाँग डिस्टंस्ट रिलेशनशिपमध्ये असतात, त्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं.
भांडणं होत नाहीत
बहुतेक जोडपी एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात तेव्हाच भांडतात. ते एकमेकांच्या येण्या-जाण्यावर, कपडे, जेवण, मित्रांवर किंवा फोनवर लक्ष ठेवतात. बऱ्याचदा जोडीदाराला या सर्व गोष्टींमुळे चिडचिड होते. कारण त्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागतात. या गोष्टींमुळे नात्यात तणाव आणि संघर्ष निर्माण होतो आणि भांडणं होऊ लागतात.
लिव्ह इनला टफ फाईट! आता वीकेंड मॅरेज, काय आहे लग्नाचा हा नवीन प्रकार, जो तरुणांना लावतोय वेड
DADT नात्यात या सर्व गोष्टींना वाव नसतो. आधुनिक जोडपी एकमेकांना सर्वकाही सांगणं आवश्यक मानत नाहीत आणि त्यांना अशी अपेक्षाही नसते की त्यांच्यासोबत गोष्टी शेअर केल्या जातील, ज्यामुळे त्यांच्यात कोणताही तणाव किंवा भांडण होत नाही.
DADT रिलेशनशिपचे तोटे
DADT नातं तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा जोडपं प्रौढ असतात. त्यांच्यात चांगली समजूतदारपणा असतो, अहंकाराचा संघर्ष नसतो आणि दोघांचेही सकारात्मक विचार असतात. परंतु DADT नातेसंबंधात, लवकर ब्रेकअप होण्याची शक्यता वाढते कारण जोडप्यांमध्ये संवादाचं अंतर असतं.
तरुण झालेला तो, अन् तारुण्याच्या उंबरठ्यावर ती, रात्रभर रोमान्स, सकाळ होताच घडलं ते...
जेव्हा प्रश्न विचारले जात नाहीत तेव्हा त्यांच्यात जवळीक नसते. म्हणजेच दोघांमध्ये भावनिक अंतर असतं. अशा परिस्थितीत जरी एक जोडीदार आपलं मन शेअर करू इच्छित असला तरी दुसरा त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता देखील वाढते कारण भावनिक बंधन नसते. जे लोक भावनिक असतात, त्यांना असे लोक आवडतात जे त्यांचं लक्षपूर्वक ऐकतात आणि प्रत्येक पावलावर त्यांना पाठिंबा देतात. DADT नातेसंबंधात संवादाच्या अभावामुळे, जोडप्यांमधील समस्या सुटत नाहीत आणि त्यांच्यात जवळीक देखील कमी राहते.