लिव्ह इनला टफ फाईट! आता वीकेंड मॅरेज, काय आहे लग्नाचा हा नवीन प्रकार, जो तरुणांना लावतोय वेड
- Published by:Priya Lad
Last Updated:
Weekend Marriage : आजवर तुम्ही अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज आणि लिव्ह इन रिलेशनशिप अशा नात्यांबाबत ऐकलं आहे. पण आता वीकेंड मॅरेजचा नवा ट्रेंड आला आहे.
आजकालची तरुणाई स्वतःला इतकी कामात गुंतवते की त्यांच्याकडे इतर गोष्टींसाठी जास्त वेळ नसतो. अगदी नात्यांसाठीही नाही. मग ते नातं पती-पत्नीचं का असेना. आता याच गोष्टींमुळे एक नवीन शब्द उदयास आला आहे. वीकेंड मॅरेज.

वीकेंड मॅरेज म्हणजे पती-पत्नी एकत्र राहत नाहीत तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार-रविवार किंवा काही ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात आणि एकत्र राहतात. व्हिडिओ कॉल, चॅट आणि सोशल मीडियामुळे अंतराची भावना कमी होते.
advertisement

वीकेंड मॅरेज म्हणजे लग्न करणं पण वेगळं राहणं. पती-पत्नी दोघंही कामामुळे वेगवेगळ्या शहरात किंवा घरात राहतात. आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी एकत्र वेळ घालवतात, नंतर पुन्हा कामावर जातात. यामुळे त्यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहते, पण दैनंदिन जबाबदाऱ्या वेगळ्या असतात.
advertisement

वीकेंड मॅरेज करण्याची मुख्य कारणं दोन्ही पार्टनर वेगवेगळ्या शहरात काम करतात. लग्नानंतरही स्वतःचे स्वातंत्र्य आणि पर्सनल स्पेस असण्याची इच्छा. एक पार्टनर शिकत असेल, स्वतःचं आयुष्य जपणं. दररोज एकत्र राहण्यामुळे येणारे वाद, संघर्ष किंवा ताणतणाव टाळणं. मानसिक शांती आणि स्वतःसाठी वेळ.
advertisement

आजचे तरुण त्यांच्या करिअरला प्राधान्य देत नात्यांमध्ये संतुलन साधू इच्छितात. त्यांना लग्न करायचे आहे पण त्यांना रोजच्या ताणतणावापासून किंवा एकाकीपणापासून दूर राहायचं आहे. थोडक्यात पारंपारिक लग्नाच्या अपेक्षांपासून दूर, लवचिकता, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणावर आधारित आधुनिक जोडप्यांमध्ये वीकेंड मॅरेज एक आदर्श बनत आहे.
advertisement
Location :
Delhi
First Published :
May 28, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लिव्ह इनला टफ फाईट! आता वीकेंड मॅरेज, काय आहे लग्नाचा हा नवीन प्रकार, जो तरुणांना लावतोय वेड