भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं अलीकडेच आयुर्वेदाचे सुवर्ण नियम म्हणजेच गोल्डन रुल्स जारी केले आहेत, खाण्याच्या सवयींमधे लहान बदल करून पचन आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
आयुर्वेद केवळ काय खावं हे शिकवत नाही, तर चांगलं पचन आणि आरोग्य लक्षात ठेवून जाणीवपूर्वक खाण्याचा मार्गदेखील सुचवले आहेत.
Tadasana : रक्ताभिसरण, पचनसंसथेसाठी अत्यंत उपयुक्त आसन, वाचा ताडासनाचे फायदे
advertisement
खाण्याची योग्य पद्धत
आयुर्वेदानुसार, योग्य अन्न म्हणजे केवळ ताटात असलेल्या गोष्टी नसून खाण्याची योग्य पद्धत देखील असते.
जेवण शांततेत आणि चांगल्या संगतीत केलं पाहिजे. जेवणादरम्यान राग, भीती किंवा ताण टाळण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला आहे कारण याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. अन्नाचा आस्वाद घेणं आणि ते हळूहळू चावणं यामुळे अन्नाची चव वाढते तर पाचक एंजाइम देखील सक्रिय होतात.
Skin Care : त्वचेची काळजी घेण्यात या चुका करु नका, चेहरा दिसेल निस्तेज
पाणी पिण्याची योग्य पद्धत
आयुर्वेदात पाणी पिण्याच्या पद्धतीकडेही लक्ष देण्यात आलंय. आयुष मंत्रालयाच्या मते, जेवणादरम्यान पाणी पिणं पचनासाठी फायदेशीर आहे. पण, जेवणानंतर पाणी पिण्यानं पचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. म्हणूनच जेवणानंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी भरपूर पाणी प्यावं. यामुळे पचनसंस्थेवर दबाव येत नाही आणि अन्न सुरळीत पचतं.
अन्न ताजं, ऋतूनुसार आणि शरीराच्या स्वभावाला अनुकूल असावं असा सल्लाही आयुर्वेदानं दिला आहे. तसंच जड जेवण टाळा आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. हे छोटे बदल केल्यानं केवळ पचनसंस्था मजबूत होण्यासोबतच मानसिक आरोग्य देखील सुधारतं.
