पिकलेल्या केळीचा तुम्ही घरी अगदी कमी साहित्यात केक बनवू शकता. हा केक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा मेहनत लागणार नाही. तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी हा केक तुम्ही बनवू शकता. कारण हा केक कुकरच्या भांड्यातही सहज बनतो.
बनाना केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- 2 पिकलेली केळी
- 1 कप मैदा
advertisement
- 1/2 कप पिठीसाखर
- 1/2 कप दूध
- 1/4 कप तेल किंवा वितळवलेले लोणी.
- 1 टीस्पून बेकिंग पावडर
- 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
- 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- चिमूटभर मीठ
- सुकामेवा
असा बनवा स्पॉन्जी बनाना केक..
- आधी कुकर तयार करून ठेवा. यासाठी कुकरमध्ये 1 ते 2 कप मीठ घाला आणि त्यावर एक स्टँड ठेवा. कुकरच्या झाकणाचे शिट्टी आणि रबर काढून टाका, झाकण लावा आणि मंद आचेवर 10 मिनिटे गरम होऊ द्या.
- एका मोठ्या भांड्यात पिकलेली केळी बारीक करून घ्या. त्यात पिठीसाखर, दूध, तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून फेटून घ्या. दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळून घ्या. यामध्ये गुठळ्या होऊ देऊ नका. त्यासाठी कोरडं मिश्रण हळूहळू केळ्याच्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
- एका स्टीलच्या डब्याला तेल लावून तयार केलेले मिश्रण त्यात टाका. हा डबा कुकरमधल्या स्टँडवर ठेवा. झाकण बंद करा आणि मध्यम आचेवर 35 ते 40 मिनिटे शिजवा.
- आता 40 मिनिटांनंतर कुकर उघडा आणि केकच्या मध्यभागी टूथपिक घालून तपासा. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आली, तर तुमचा केक तयार आहे. तो बाहेर काढा आणि सर्व्ह करण्यापूर्वी 15 मिनिटे थंड होऊ द्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
