औषधं वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायची असतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर तुम्हाला डॉक्टर काही गोळ्या नाश्त्याआधी म्हणजे उपाशीपोटी आणि काही जेवणानंतर खाण्याचा सल्ला देतात. जेवणानंतर खाण्याच्या गोळ्या उपाशीपोटी खाल्ल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
काय! तुम्ही झोपताय ती उशी टॉयलेट सीटपेक्षाही घाण, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
न्यूज18शी बोलताना डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितलं की. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच गोळ्या खाव्यात. गॅसचं औषध रिकाम्या पोटी म्हणजे नाश्त्याआधी खावी. पण अँटिबायोटिक्स, भारी औषधं असतील तर काही खाल्ल्यानंतरच घ्यावीत. औषधं पोटात जातात आणि अशी औषधं उपाशीपोटी घेतली तर अॅसिडीटी, पोटात जळजळ, उलटी होते आणि इतर काही काही समस्या उद्भवतात.
advertisement
पण औषधं सुरू असताना उपवास ठेवायची इच्छा असेल तर काय करायचं, औषधं कशी घ्यायची काय काळजी घ्यायची? याबाबत जनरल फिजिशिअन डॉ. प्रज्वलित सोनकांबळे यांनी सांगितलं की, शक्यतो औषधं सुरू असताना उपवास करूच नये आणि केला तर मग फळं किंवा साबुदाणा खिचडी असं काहीतरी खावं आणि मगच औषधं घ्यावीत. उपाशीपोटी औषधं घेऊ नयेत.