शेपूची फळं एक स्थानिक पारंपारिक पदार्थ. त्यामुळे काही लोकांना हा माहिती असेल तर काहींना नाही. शेपूची फळं म्हणजे काय? ती कशी बनवायची? त्यासाठी काय काय साहित्य लागतं? संपूर्ण माहिती आणि कृती आम्ही तुम्हाला इथं देत आहोत.
शेपूची फळं करण्यासाठी साहित्य
शेपूची एक जुडी निवडून धुवून बारीक चिरून घ्या
अडीच वाट्या गव्हाचं पीठ
advertisement
चवीनुसार मीठ
Guava Recipe Video : पेरूचा हलवा, एकदा खाल तर गाजरचा हलवा कायमचा विसरून जाल
पाव चमचा ओवा
पाव चमचा जिरं
पाव चमचा हळद
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरं
पाव चमचा हिंग
कढीपत्ता
एक टीस्पून बारीक चिरलेला लसूण
एक चमचा लाल तिखट किंवा तुमचा कोणताही घरगुती मसालाट
बारीक चिरलेली कोथिंबीर
शेपूची फळं कशी बनवायची?
एका परातीत गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला शेपू, ओला, जिरं, हळद सर्व साहित्य एकत्र करून घ्या. थोडं थोडं पाणी घालून पीठ मिळून घ्या. थूप घट्ट किंवा पातळही नाही. नीट मळलं ती तेल लावून घ्या. त्याचे गोळे करा आणि हाताला तेल लावून चपट्या करून घ्या. त्याला तेल लावून घ्या. म्हणजे उकडताना ते चिकटणार नाही. स्टिमर, स्टिमर नसेल तर कढईत पाणी ठेवून त्याच्यावर चाळणीला तेल लावून त्यात हे शेपूचे केलेल चपटे गोळे म्हणजे फळं ठेवायचे आणि 15-20 मिनिटं वाफवून घ्या. हात लावून बघा. हाताला चिकट लागत नसतील तर ती नीट शिजली.
Dink Gond Recipe Video : डिकांचे लाडू नेहमीच खाता, या थंडीत ट्राय करा डिंकाचा चहा
एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्ही यावर कढी टाकून खाऊ शकता किंवा यावर फोडणी टाकून खाऊ शकता. फोडणीसाठी एका कढईत तेल घ्या. त्यात पाव चमचा मोहरी घाला, मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, एक टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. आता यात शेपूची फळं टाकून 2-3 मिनिटं मिक्स करा. झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ द्या म्हणजे फोडणी आत मुरेल. आता एक-दोन टीप्सून भाजलेला दाण्याचा जाडसर कूट टाकून परतून घ्या.
नाश्त्याला किंवा साइड डिश म्हणून खाऊ शकता. नाश्त्याला तुम्ही दद्यासोबत किंवा कढीसोबत खाऊ शकता. युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही शेपूची फळं कधी खाल्ली आहेत का? तुम्हाला कशी वाटली? कशी लागली? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही शेपूची अशी काही वेगळी रेसिपी बनवत असला तर तीसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.
