कामावर, कॉलेजमधे, प्रवासात असो किंवा कसरत करताना, अनेक जण दिवसभर त्यांचा वापर करतात. पण या इअरफोन्सनी श्रवणशक्ती हळूहळू बिघडते आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. इअरफोन्स थेट कानापर्यंत आवाज पोहोचवतात, ज्यामुळे कानातील संवेदनशील नसांवर दबाव वाढतो. जास्त वेळ जास्त आवाजात ऐकल्यानं अस्वस्थ वाटू शकतं. सुरुवातीला, फक्त सौम्य आवाजानंच अस्वस्थता जाणवते, पण हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. इअरफोन मोठ्या आवाजात वापरण्यानं भविष्यात मोठ्या समस्या जाणवू शकतात.
advertisement
Hair Care : कोरियन हेअर केअरची जादू, घरी तयार करता येईल हेअर पॅक
दिवसभर इअरफोन वापरण्याचे धोके
- सतत इअरफोन घातल्यानं कानाच्या संसर्गाचा धोका वाढतो.
- मळ तयार होणं यासारख्या कानाच्या नैसर्गिक स्वच्छतेत बाधा येते.
- जास्त वेळ मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यानं श्रवणशक्ती कमी होऊ शकते.
- श्रवणशक्तीच्या संरक्षणासाठी या टिप्स लक्षात ठेवा -
- नेहमी साठ टक्क्यांपेक्षा जास्त आवाजात संगीत किंवा व्हिडिओ ऐकणं टाळा.
- दर दोन तासांनी इअरफोन काढून कानांना विश्रांती द्या.
Health Tips : आहारात दडलंय थकवा वाटण्याचं कारण, लगेच करा बदल, अशक्तपणा होईल दूर
- संसर्ग टाळण्यासाठी इअरफोन आणि कान दोन्ही स्वच्छ ठेवा. यामुळे बाह्य आवाज कमी होतात, ज्यामुळे कमी आवाजात ऐकणं शक्य होतं.
इअरफोन्समुळे सोय होते, पण त्यांचा गैरवापर आपल्या श्रवण आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतो. सावधगिरी आणि सवयी योग्य असतील तर श्रवणशक्ती टिकून राहू शकते.