TRENDING:

Skin Care : चेहऱ्यावर मध लावावा का ? मध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे का ? वाचा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

मधात दाहक-विरोधी, जीवाणूविरोधी, एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात.मधामुळे त्वचेची जळजळ कमी होते, त्वचेवरचे जीवाणू काढायला मदत होते, त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि त्वचा मॉइश्चरायझ राहते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मध हा चांगला पर्याय आहे. प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपचारांसाठी मधाचा वापर केला जातो. मध त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
News18
News18
advertisement

चेहऱ्यावर मध लावला तर एलर्जी येईल का ? नक्की काय परिणाम होईल याबद्दलची माहिती पाहूया. अलीकडेच, प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ गुरवीन वरैच यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. मधात दाहक-विरोधी, जीवाणूविरोधी, एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म असल्याचं त्यांनी या पोस्टमधे म्हटलं  आहे. मधामुळे त्वचेची जळजळ कमी होते, त्वचेवरचे जीवाणू काढायला मदत होते, त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि त्वचा मॉइश्चरायझ राहते.

advertisement

Health Tips : सुदृढ शरीरासाठी हेल्थ टिप्स, योगासनं ठेवतील तब्येत ठणठणीत

त्वचेसाठी मधाचा वापर कसा करण्यासाठी काही टिप्स -

मध थेट चेहऱ्यावर लावू शकता किंवा ओट्स आणि दह्यात मिसळून मास्क बनवू शकता. तयार केलेला मास्क हलक्या हातांनी संपूर्ण चेहऱ्यावर लावा, दहा-पंधरा मिनिटं मास्क तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मऊ आणि चमकदार दिसेल.

advertisement

मधाव्यतिरिक्त, त्वचारोगतज्ज्ञांनी त्वचेसाठी काही इतर सोप्या टिप्स सुचवल्या आहेत.

त्वचेसाठी मधाव्यतिरिक्त इतरही पर्याय -

दही - दह्यातलं लॅक्टिक एसिड जे एक प्रकारचं अल्फा हायड्रॉक्सी एसिड आहे. यामुळे त्वचा हळूवारपणे एक्सफोलिएट होते आणि मृत त्वचा काढून टाकायला मदत होते. त्वचा उजळ करण्यासाठी आणि टॅनिंग कमी करण्यासाठी दही उपयुक्त आहे. दह्याचा मास्क बनवून चेहऱ्यावर लावू शकता.

advertisement

Health tips : आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त मात्रा, शरीरासाठी शक्तिशाली ठरतील हे उपाय

ओट्स - ओट्समधे सॅपोनिन्स आणि एव्हेनॅन्थ्रामाइड्स असतात, त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी यामुळे मदत होते. ओट्स पावडर मध किंवा दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.

पपई - त्वचेसाठी पपई हा देखील चांगला पर्याय आहे. पपईतले पपेन एंजाइम मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते, यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि टॅनिंग कमी होतं.

advertisement

कच्चा मध, दही, ओट्स आणि पपई यांसारखे नैसर्गिक घटक त्वचेला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय फायदेशीर ठरू शकतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यावर मध लावावा का ? मध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे का ? वाचा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल