TRENDING:

Winter Care : हिवाळ्यात अशी घ्या हातापायांची काळजी, भेगा घालवण्यासाठी घरी बनवा पेट्रोलियम जेली

Last Updated:

घरी खरी पेट्रोलियम जेली बनवणं शक्य नसलं तरी, तुम्ही घरी सहजपणे त्यासाठीचा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय बनवू शकता. याचे गुणधर्म पेट्रोलियम जेलीसारखेच आहेत, यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि मऊ राहण्यास मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात अनेकांना टाचांना भेगा पडणं ही समस्या जाणवते. थंड आणि कोरडी हवा त्वचेला हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे टाचांची काळजी घेणं आणखी कठीण होतं. म्हणून, या आजारांवर उपचार करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर केला जातो.
News18
News18
advertisement

पेट्रोलियम जेली हे नैसर्गिक मेण आणि खनिज तेलांचं मिश्रण आहे. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ करायला मदत होते. यासाठी पेट्रोलियम जेली विकत आणत असाल तर आधी ही माहिती वाचा.

Skin Care : तांदळाच्या पिठाचा फेसपॅक, चेहरा दिसेल स्वच्छ, नक्की वापरुन पाहा

घरी खरी पेट्रोलियम जेली बनवणं शक्य नसलं तरी, तुम्ही घरी सहजपणे त्यासाठीचा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय बनवू शकता. याचे गुणधर्म पेट्रोलियम जेलीसारखेच आहेत, यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते आणि मऊ राहण्यास मदत होते.

advertisement

घरी पेट्रोलियम जेली बनवण्यासाठी लागणारं साहित्य - नारळाचं तेल, दोन टेबलस्पून मेण, ऑलिव्ह ऑइल आणि

ग्लिसरीन.

घरी पेट्रोलियम जेली बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडं पाणी गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यावर काचेचं भांडं ठेवा. भांड्यात नारळाचं तेल आणि मेण घाला. मेण पूर्णपणे वितळेपर्यंत मध्यम ते कमी आचेवर हे मिश्रण गरम करा.

advertisement

मेण आणि खोबरेल तेल पूर्णपणे वितळलं की, भांडं गॅसवरून काढा. बाऊलमधे ऑलिव्ह ऑइल घाला आणि मिश्रण क्रिमी होईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्या.

Winter Care : हिवाळ्यासाठी खास स्किन केअर टिप्स, कोरडी त्वचा होईल मुलायम

आणखी कोणतीही तेलं घालायचं असतील तर वापरु शकता. नंतर, हे मिश्रण काळजीपूर्वक स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात किंवा कंटेनरमधे ओता. पेट्रोलियम जेली तयार आहे. ते सेट होण्यासाठी दोन-तीन तास ​​राहू द्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोटासाठी किती दिवस रस्त्यावर नाचायचं? डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
सर्व पहा

थंड झाल्यावर ते जाड होऊन पेट्रोलियम जेलीसारखे दिसेल. फुटलेले ओठ, कोरडे हातपाय आणि टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी ही घरगुती जेली वापरा. ​​हिवाळ्यात ही पेट्रोलियम जेली नियमितपणे लावल्यानं टाचेच्या भेगा कमी होण्यास मदत होईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Care : हिवाळ्यात अशी घ्या हातापायांची काळजी, भेगा घालवण्यासाठी घरी बनवा पेट्रोलियम जेली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल