पण तुम्हाला या सोनपापडीचा इतिहास माहितीय का? शिवाय ती कोण-कोणत्या नावाने ओळखली जाते माहितीय?
सान पापरी (San Papri)
शोम्पापरी (Shompapri)
सोहन पापडी (Sohan Papdi)
शोनपापडी (Shonpapdi)
पेटिना (Petina)
सोनपापडीचा इतिहास
सोनपापडी कुठे आणि कधी तयार झाली याबद्दल नेमकी माहिती नाही. काही लोक सांगतात की ती पहिल्यांदा राजस्थानात बनवली गेली, तर काहींना वाटतं की ती महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाई आहे.
advertisement
ही मिठाई तुर्कीच्या पिश्मानिये (Pişmaniye) मिठाईशी मिळती-जुळती आहे, कारण दोन्ही गोड पदार्थ धाग्यासारख्या परतदार बनतात. फरक इतकाच की पिश्मानिये गव्हाच्या पीठापासून बनते, तर सोनपापडी बेसन आणि साखरेच्या पाकापासून तयार केली जाते.
सोनपापडी कशी तयार होते?
सोनपापडीची खासियत म्हणजे तिची परतदार बनावट. तिच्यासाठी लागणारी मुख्य सामग्री:
बेसन
मैदा
साखरेचा पाक (साखर + पाणी + ग्लुकोज)
तूप
सजावटीसाठी बदाम-पिस्ते
तयार करण्याची पद्धत:
बेसन आणि मैदा तुपात छान भाजले जातात. नंतर त्यात गरम साखरेचा पाक मिसळून सतत त्याला हालवलं आणि मग ओढलं जातं. या ओढण्याच्या प्रक्रियेतून मिठाईला हलक्या धाग्यासारख्या परती तयार होतात. शेवटी तिला चौकोनी आकार देऊन वरून मेवे टाकले जातात.
दिवाळीतील गिफ्टिंगसाठी सोनपापडी
सोनपापडी दिवाळीमध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी आणि भेटीसाठी लोकप्रिय मिठाई आहे. बाजारात ती ₹150 ते ₹200 प्रति किलो दराने सहज उपलब्ध होते, त्यामुळे प्रत्येक घरात तिचं स्थान आहे. जरी सोशल मीडियावर तिला “फिरती मिठाई” म्हणून मीम्स शेअर केले जातात, पण असं असलं तरी तिची लोकप्रियता कायम आहे.