अयोध्या: प्रभू राम अयोध्येत विराजमान झाल्यापासून देश-विदेशातून दररोज लाखो रामभक्त दर्शनासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील आज अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी परिसरात असलेल्या रामलल्लाच्या भव्य मंदिराला भेट देऊन पूजा केली आणि मंदिरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर सुनील गावस्कर उत्साही दिसले आणि त्यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून मंदिर उभारणीशी संबंधित सविस्तर माहिती घेतली.
advertisement
सुनील गावस्कर यांनी चंपत राय यांच्याशी तासभर संवाद साधला आणि त्यानंतर ते पवनपुत्र हनुमानाच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद ही घेतले. त्यांचा अयोध्या दौरा पूर्णपणे गोपनीय होता. दर्शनानंतर सुनील गावस्कर म्हणाले, "खूप छान वाटलं, धन्यता वाटली. रामलल्लाचे आशीर्वाद मिळणे हा खूप सुखद अनुभव आहे."
11 कोटी लोकांनी दिली भेट
खरं तर सुनील गावस्कर गुपचूप अयोध्येत पोहोचले होते, जिथे त्यांनी सिद्ध पीठ हनुमानगडमध्ये भगवान राम आणि पवन पुत्र हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यांनी राम मंदिरात एक तासाहून अधिक काळ मुक्काम केला आणि ट्रस्टच्या सरचिटणीसांशी मंदिर उभारणीसंदर्भात चर्चा केली. प्रभू राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 11 कोटी लोकांनी अयोध्येला भेट दिली आहे.
