TRENDING:

Gallbladder : पित्ताशयातल्या खड्यांमुळे दुखतं पोट, जाणून घ्या लक्षणांपासून उपचारांपर्यंतची सविस्तर माहिती

Last Updated:

पित्ताशयातल्या खड्यांचं अगदी सुरुवातीचं लक्षण म्हणजे पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होणं. ही वेदना कधीकधी छाती, पाठ किंवा उजव्या खांद्यापर्यंत पसरू शकते. जड किंवा तेलकट अन्न खाल्ल्यानंतर वेदना सामान्यतः वाढतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजची माहिती पित्ताशयात होणाऱ्या खड्यांविषयीची. विविध कारणांमुळे पोटात दुखू शकतं, काही वेळा हे दुखणं थोड्या वेळानी किंवा औषध घेतल्यावर थांबतंही. पण पोटात तीक्ष्ण किंवा तीव्र वेदना जाणवत असतील, तर ते फक्त गॅस किंवा अपचन आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण, कधीकधी ही वेदना शरीरात लपलेल्या गंभीर समस्येचे लक्षण असतं.
News18
News18
advertisement

पोटाच्या वरच्या उजव्या भागात दुखून वेदना पाठीवर किंवा खांद्यावर पसरत असतील आणि खाल्ल्यानंतर वाढत असतील, तर ते पित्ताशयातल्या खड्यांचं लक्षण असू शकतं. पित्ताशयातल्या खड्यांचं अगदी सुरुवातीचं लक्षण म्हणजे पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होणं. ही वेदना कधीकधी छाती, पाठ किंवा उजव्या खांद्यापर्यंत पसरू शकते. जड किंवा तेलकट अन्न खाल्ल्यानंतर वेदना वाढतात. काही प्रकरणांत, रुग्णाला मळमळ, उलट्या आणि अपचन देखील होऊ शकतं.

advertisement

Cough : कफावर सुरक्षित आणि घरगुती उपचार, घशाची सूजही होईल कमी

पित्ताशयाच्या खडयांची मुख्य लक्षणं

पोटाच्या वरच्या उजव्या भागात तीव्र वेदना

मागे किंवा खांद्यापर्यंत पसरणाऱ्या वेदना

मळमळ आणि उलट्या

अपचन आणि पोट फुगणं

कावीळ

ताप आणि थंडी वाजून येणं

पित्ताशयात खडे का तयार होतात ?

कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण

लठ्ठपणा

advertisement

हार्मोनल बदल

तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं जास्त सेवन

फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणं

डिहायड्रेशन आणि दीर्घकाळ उपवास करणं

Yoga Asana : बैठ्या जीवनशैलीनं वजन वाढतंय ? योगासनं करतील लठ्ठपणा कमी, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

वर उल्लेख केलेली लक्षणं आढळली तर उशीर करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

advertisement

चाचण्या आणि उपचार

उपचार - आहार नियंत्रण आणि औषधं सुरुवातीच्या टप्प्यात आराम देऊ शकतात, पण पित्ताशयातले खडे मोठे असतील किंवा खूप खडे असतील तर शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी आधी अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते ज्याद्वारे पित्ताशयात खडे आहेत आणि किती आहेत हे कळतं. ही सर्वात सोपी आणि अचूक चाचणी मानली जाते.

advertisement

प्रतिबंधात्मक उपाय

तेल आणि चरबी - फॅटचं सेवन मर्यादित करा.

नियमित व्यायाम करा

फळं, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घ्या

पुरेसं पाणी प्या

जास्त काळ उपाशी राहू नका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

पोटाच्या वरच्या उजव्या भागात वारंवार वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे योग्य उपचार सुरू होतील. वेळेवर निदान आणि उपचार केल्यानं वेदना कमी होतील आणि मोठा धोका टाळता येईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gallbladder : पित्ताशयातल्या खड्यांमुळे दुखतं पोट, जाणून घ्या लक्षणांपासून उपचारांपर्यंतची सविस्तर माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल