TRENDING:

Meningitis : मेंदूची सूज आरोग्यासाठी धोकादायक, वेळीच लक्षणं ओळखा, सावध राहा

Last Updated:

मेंदूचा ताप हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये वेळेवर उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. मेंदूच्या तापाला वैद्यकीय भाषेत मेनिंजायटीस म्हणतात. यात मेंदू आणि पाठीच्या कण्याला व्यापणाऱ्या पडद्यामध्ये (मेनिन्जेस) सूज येते. ही सूज बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे होऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एखाद्या कारणानं डोकं दुखणं, थोड्यावेळानं बरं वाटणं हे होऊ शकतं पण अचानक तीव्र डोकेदुखी होऊ लागली, प्रकाशामुळे डोळ्यांसमोर खाज सुटली आणि तापही येऊ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं मेंदूच्या तापाची म्हणजेच मेनिंजायटीसची असू शकतात.
News18
News18
advertisement

मेंदूचा ताप हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये वेळेवर उपचार केले नाहीत तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. मेंदूच्या तापाला वैद्यकीय भाषेत मेनिंजायटीस म्हणतात. यात मेंदू आणि पाठीच्या कण्याला व्यापणाऱ्या पडद्यात (मेनिन्जेस) सूज येते. ही सूज बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे होऊ शकते.

मेनिंजायटीसची लक्षणं -

तीव्र आणि सतत डोकेदुखी

advertisement

खूप ताप

प्रकाश पाहिल्यावर डोळ्यांत वेदना किंवा खाज सुटणं

मानेत जडत्व जाणवणं

उलट्या आणि मळमळ

बेशुद्धी

लहान मुलांचं रडण्याचं प्रमाण वाढतं आणि सुस्ती येते.

ही लक्षणं एकत्र दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Vitamin D : व्हिटॅमिन डीचं अतिरिक्त सेवन ठरेल धोकादायक, शरीरावर होतील गंभीर परिणाम

मेनिंजायटीस कशामुळे होतो?

जिवाणू संसर्ग: जसं की निसेरिया मेनिन्जिटिडिस किंवा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया.

advertisement

विषाणूजन्य संसर्ग: सहसा कमी गंभीर परंतु तरीही धोकादायक असू शकतात.

बुरशीजन्य संसर्ग: कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांमधे अधिक सामान्य आहे.

संसर्ग बहुतेकदा नाक, कान किंवा घशातून सुरू होतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो.

जास्त धोका कोणाला असतो?

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना, गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना, अलीकडेच डोकं किंवा कानाच्या संसर्गानं ग्रस्त असलेले नागरिक

advertisement

उपचार -

बॅक्टेरियल मेनिंजायटीसमध्ये, अँटीबायोटिक्स ताबडतोब दिले जातात. याचं प्रमाण कमी करण्यासाठी औषधं आणि विश्रांतीचा सल्ला दिला जातो. रुग्णाला रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे जेणेकरून त्याची ऑक्सिजन पातळी, रक्तदाब आणि शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवता येईल.

प्रतिबंधात्मक उपाय

मुलांना अँटी मेनिंजायटीस लस द्या. स्वच्छतेची काळजी घ्या. संक्रमित व्यक्तीच्या खूप जवळ जाणं टाळा. तुम्हाला सर्दी, खोकला किंवा कानाचा संसर्ग झाला असेल तर वेळेवर उपचार घ्या.

advertisement

Yoga : स्क्रीन टाइम कमी करा, व्यायाम - आहाराकडे लक्ष द्या, बाबा रामदेवांचा फिटनेस मंत्रा

उपचार -

अचानक जास्त ताप, डोकेदुखी, प्रकाशाचा त्रास आणि मान जड वाटत असेल तर उशीर करू नका. कारण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

मेनिंजायटीस वेगानं वाढतो आणि उपचारात विलंब होणं प्राणघातक ठरू शकतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Meningitis : मेंदूची सूज आरोग्यासाठी धोकादायक, वेळीच लक्षणं ओळखा, सावध राहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल