फुफ्फुसांच्या आजारात सर्वात धोकादायक आहे दमा. हा आजार सर्व वयोगटांना भेडसावतो. यात रुग्णांना श्वसनमार्ग आणि स्नायूंभोवती जळजळ आणि कडकपणा जाणवतो. हे किती धोकादायक आहे याचा अंदाज दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या दम्याच्या रुग्णांच्या संख्येवरून येतो. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ सतत खबरदारी घेण्याचा सल्ला देतात.
Weight Loss : वजन कमी करायचंय ? चालण्याचं आणि कॅलरी बर्न होण्याचं गणित समजून घ्या
advertisement
भारतातील दम्याची परिस्थिती
अंदाजानुसार, भारतात दरवर्षी दोन लाखांहून अधिक जण दम्यामुळे मृत्यू पावतात. 2021 च्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अहवालानुसार, भारतात दम्याच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे.
उपचार लवकर केले तर याचा त्रास रोखता येतो असं श्वसन रोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ग्लोबल अस्थमा 2022 च्या अहवालानुसार, भारतात 3.5 दशलक्ष रुग्ण दम्याचे आहेत.
अनेक प्रकरणांत, दम्याचा त्रास वाढतो. झपरिस्थिती इतकी गंभीर देखील होते की आपत्कालीन उपचारांची आवश्यकता भासू शकते. अशावेळी इनहेलरचा वापर त्वरीत करावा.
Snoring : घोरण्याच्या समस्येवर हे उपाय करुन बघा, डॉक्टरांनी सांगितली खास युक्ती
दम्याची लक्षणं व्यक्तीनुसार बदलतात. धूळ किंवा अॅलर्जीच्या संपर्कात आल्यानं दमा आणखी वाढू शकतो.
असा काही त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत घट्टपणा किंवा वेदना जाणवणं, श्वास बाहेर टाकताना घरघर येणं. दमा असलेल्या मुलांमधे ही लक्षणं आढळतात. खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणं आणि छातीत दुखणं असे त्रास जाणवतात.
दमा हा एक जुनाट आजार आहे, श्वास घेण्यास त्रास होणं, चिंता, छातीत जडपणा अशी लक्षणं असू शकतात. इनहेलरनं आराम मिळाला नाही तर दमा खूप धोकादायक ठरू शकतो.