Weight Loss : वजन कमी करायचंय ? चालण्याचं आणि कॅलरी बर्न होण्याचं गणित समजून घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चालून कॅलरीज कमी करण्याचा विचार करत असाल, तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला किती वेगानं चालणं आवश्यक आहे समजून घेऊया. जेणेकरून कॅलरीज जलद बर्न होतील आणि लठ्ठपणा वेगानं कमी होईल.
मुंबई : लठ्ठपणा हा अनेकांसाठी प्रमुख चिंतेचा विषय आहे, कारण लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. ज्यात विविध औषधं, दररोज सकाळ आणि संध्याकाळी फिरणं अशा अनेक उपायांचा समावेश आहे.
चालून कॅलरीज कमी करण्याचा विचार करत असाल, तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला किती वेगानं चालणं आवश्यक आहे समजून घेऊया. जेणेकरून कॅलरीज जलद बर्न होतील आणि लठ्ठपणा वेगानं कमी होईल.
किती वेगानं चालणं आवश्यक ?
advertisement
चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय स्नायूंची वाढ देखील होते. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि आयुष्यातील ताण कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करायचं असेल, तर सामान्यरित्या चालण्याचा वेग ताशी तीन ते चार किमी असावा, यामुळे कॅलरीज कमी होतात. ब्रिक वॉकिंग पाच ते सहा किमी प्रति तास असावं, वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
advertisement
पॉवर वॉकिंगमधे वेग ताशी सहा ते सात किमी असावा, एखाद्याचं वजन सुमारे साठ किलो असेल, आणि एका तासात पाच किलोमीटर चाललात तर तो दोनशे ते दोनशे वीस कॅलरीज बर्न होतात. वजन सत्तर किलो असेल तर 250 ते 260 कॅलरीज बर्न होतील. वजन 80 किलो असेल तर 300 ते 320 कॅलरीज बर्न होतील.
advertisement
हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्स 2021 नुसार, 70 किलो वजनाची व्यक्ती ताशी 6 किमी वेगानं चालली तर सुमारे दीडशे कॅलरीज बर्न होऊ शकतात.
एक किलोग्रॅम चरबी कमी करण्यासाठी, 7700 कॅलरीज बर्न कराव्या लागतील. चालण्यानं दररोज अडीचशे ते तीनशे कॅलरीज बर्न करत असाल, तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांत एक किलो वजन कमी करू शकता. हे सर्व केवळ चालण्यावर नाही तर आहारावर अवलंबून आहे.
advertisement
वेगानं चालण्यानं फक्त कॅलरीज बर्न होत नाहीत तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे चयापचय सक्रिय राहतं, ज्यामुळे चरबी कमी होण्यास गती मिळते. हृदयासाठी आणि फुफ्फुसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासाठी दररोज तीस ते साठ मिनिटं चालण्याचं ध्येय ठेवता येऊ शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करायचंय ? चालण्याचं आणि कॅलरी बर्न होण्याचं गणित समजून घ्या