युरिक अॅसिड क्रिस्टल्स केवळ सांध्यातच नाही तर त्वचेखाली देखील जमा होऊ शकतात, ज्यामुळे विविध लक्षणं दिसून येतात. पुढे सांगितलेली पाच लक्षणं आढळली तर वेळीच सावध व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर आणि योग्य उपचार करता येतील.
High BP : ब्लड प्रेशरची ही अदृश्य लक्षणं माहिती आहेत ? जाणून घ्या सविस्तर माहिती
advertisement
त्वचेवर वेदनादायक गाठी - यूरिक अॅसिड वाढलं की, सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्वचेखाली लहान, कठीण गाठी तयार होणं. या गाठी बहुतेकदा कान, बोटं, कोपर आणि घोट्यांभोवती दिसतात. त्या कधीकधी वेदनादायक असू शकतात. गाठी खूप मोठ्या झाल्या तर त्यामधून पांढरा, खडूसारखा पदार्थ देखील बाहेर पडू शकतो.
त्वचेचा रंग बदलणं - सांध्याभोवती युरिक अॅसिडचे स्फटिक जमा होतात तेव्हा त्या भागातील त्वचा लाल किंवा जांभळी होऊ शकते. सूज आणि जळजळीमुळे हे होऊ शकतं. त्वचा ताणलेली आणि चमकदार दिसू शकते. सांध्यावर त्वचेच्या रंगात अचानक बदल दिसला तर हे एक गंभीर धोक्याचं लक्षण असू शकतं.
लाल किंवा जांभळे डाग - युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यानं त्वचेवर लाल किंवा जांभळे डाग दिसू शकतात. हे डाग बहुतेकदा सांध्याभोवती दिसतात. हे शरीरात काहीतरी अयोग्य असल्याचं लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Hair Care : लांबसडक केसांसाठी देसी फंडा, केसांची वाढ होईल व्यवस्थित, दिसाल सुंदर
त्वचेला खाज सुटणं - काहींना युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यामुळेही त्वचेला खाज येऊ शकते. त्वचेच्या वरच्या थराखाली युरिक अॅसिडचे स्फटिक जमा होतात, ज्यामुळे जळजळ आणि खाज येते तेव्हा असं होऊ शकतं. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत खाज येत असेल, तर युरिक अॅसिडची पातळी तपासणंं महत्त्वाचं ठरेल.
जखमा हळूहळू बऱ्या होणं - वाढलेल्या यूरिक अॅसिडचं प्रमाण केवळ सांध्यांवरच नाही तर शरीराच्या आतही परिणाम करतं. यामुळे सूज वाढू शकते, ज्यामुळे जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागू शकतो. किरकोळ जखमा बऱ्या होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणं हे देखील एक लक्षण असू शकतं.
