मनुस्मृती, गरुड पुराण आणि आपस्तंब धर्मसूत्र यांसारख्या ग्रंथांमध्ये लैंगिक अत्याचाराला अजिबात क्षमा नव्हती. चला, जाणून घेऊया प्राचीन भारतात या गुन्ह्यासाठी काय शिक्षा होत्या...
मनुस्मृतीचा कठोर न्याय
मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले गेले होते. त्यानुसार, बलात्कार किंवा अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाशिवाय दुसरी कोणतीही माफी नव्हती.
- श्लोक ८.३५२ नुसार, जो कोणी बलात्कार, विनयभंग किंवा व्यभिचार करतो, त्याला इतरांना धडा मिळेल अशी कठोर शिक्षा देण्याची जबाबदारी राजाची होती.
- एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, बलात्कारी पुरुषाला गरम लोखंडाच्या बिछान्यावर झोपवून, तो मरेपर्यंत त्याला जाळले जावे.
- मनुस्मृतीने स्पष्ट केले आहे की, राजाने या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी, जेणेकरून समाजात दहशत निर्माण होईल.
advertisement
गरुड पुराणातील नरकयातना
गरुड पुराणानुसार, या गुन्ह्याची शिक्षा केवळ पृथ्वीवरच नाही, तर मृत्यूनंतर नरकातही भोगावी लागत असे.
- जो माणूस महिलेवर लैंगिक अत्याचार करतो, त्याला भयंकर विषारी सापांमध्ये सोडले जावे किंवा हिंस्त्र जनावरांकडून चिरडून मारले जावे, अशी शिक्षा सांगितली आहे.
- इतकेच नाही, तर अशा लोकांना विष्ठा, मूत्र, रक्त आणि विषारी किड्यांनी भरलेल्या विहिरीत ते मरेपर्यंत फेकत असतं.
- गरुड पुराणात जनावरांवर बलात्कार करणाऱ्यांसाठीही कठोर शिक्षा होती. अशा व्यक्तीला धारदार वस्तूंना मिठी मारायला लावली जात असे, जेणेकरून त्या वस्तू त्याच्या शरीरात आरपार घुसतील.
आपस्तंब धर्मसूत्राचे स्पष्ट नियम
आपस्तंब धर्मसूत्रात गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षेचे नियम दिले आहेत, जे तत्कालीन न्यायव्यवस्थेची स्पष्टता दर्शवतात.
- जर एखादा पुरुष अजाणतेपणाने महिलेच्या खोलीत शिरला, तर त्याला केवळ ताकीद दिली जात असे.
- पण जर त्याने जाणूनबुजून खोलीत प्रवेश करून गैरवर्तन केले, तर त्याला मारहाण करून दंड ठोठावला जात असे.
- आणि जर त्याने मुलीवर बलात्कार केला, तर त्याची सर्वात कठोर शिक्षा होती - त्याचे शिश्न आणि अंडकोष (गुप्तांग) कापून टाकले जावेत.
या शिक्षा आजच्या काळात अमानुष वाटू शकतात, पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, प्राचीन भारतातही स्त्रीच्या सन्मानाला किती महत्त्व दिले जात होते. या कायद्यांचा मुख्य उद्देश केवळ गुन्हेगाराला शिक्षा देणे हा नव्हता, तर समाजात असा धाक निर्माण करणे होता की, पुन्हा कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.
हे ही वाचा : Travel : रोमँटिक ट्रिपचा करताय प्लॅन? भारतातील 'या' 5 ऑफबीट ठिकाणी ताऱ्यांखाली घालवा अविस्मरणीय रात्र
हे ही वाचा : Alcohol : तुम्ही तर चुकीच्या पद्धतीने पीत नाही ना रम? 99 टक्के लोकांना नाही माहिती योग्य पद्धत