या मेणबत्त्या फुलांचे, खाद्यपदार्थांचे आणि इतर आकर्षक वस्तूंच्या आकारांत तयार करण्यात आल्या आहेत. लाडू कँडल, चहा-बिस्किट कँडल, आईस्क्रीम कँडल यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकारांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. या सर्व मेणबत्त्या सुगंधित असून घरात प्रसन्न, उत्सवी वातावरण निर्माण करतात.
advertisement
दुकानात ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार रंग, सुगंध आणि आकारांमध्ये कस्टमाइज्ड कँडल्स तयार करून दिल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी काहीतरी हटके आणि विशेष सजावट किंवा भेटवस्तू शोधत असाल, तर या मेणबत्त्या परिपूर्ण पर्याय ठरू शकतात.
किंमतीच्या बाबतीत या मेणबत्त्या 30 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत विविध रेंजमध्ये उपलब्ध आहेत. फ्लॉवर कँडल्स 30 ला, जेल वॅक्स कँडल्स 90 ला, टी कप कँडल्स 120 ला, गोलाकार जार कँडल्स 210-280 पर्यंत, तर लाडू व चहा-बिस्किट कँडल्स 150-250 रुपयांमध्ये मिळतात.
विशेष म्हणजे या मेणबत्त्यांचा वापर केवळ दिवाळीपुरताच मर्यादित नाही. घराच्या दररोजच्या सजावटीसाठी, खास प्रसंगांमध्ये वातावरण निर्मितीसाठी किंवा मेडिटेशन, योगा आणि रीलॅक्सेशनसाठीही या सुगंधित मेणबत्त्या वापरता येतात. त्यामुळे दिवाळीनंतरही या मेणबत्त्यांना घरामध्ये एक वेगळीच शोभा प्राप्त होते.