Business Ideas : दिवाळीत करा घरीच बिझनेस, 30 रुपयांना घ्या अन् 50 ला विका! ठाण्यात इथं करा खरेदी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
ग्राहकांसाठी अत्यंत रंगीबेरंगी आणि मनमोहक डिझाईन्समध्ये मेणबत्त्या आणि दिवे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
ठाणे: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वत्र सजावटीची तयारी जोरात सुरू झाली आहे. दिवे आणि मेणबत्त्यांचा झगमगाट प्रत्येक घराची शोभा वाढवत असल्याने बाजारात यावर्षी विविध प्रकारच्या आकर्षक आणि सुगंधित मेणबत्त्यांना विशेष मागणी पाहायला मिळत आहे. ठाण्यातील आर्टिस्टो आर्ट स्टुडिओमध्ये ग्राहकांसाठी अत्यंत रंगीबेरंगी आणि मनमोहक डिझाईन्समध्ये मेणबत्त्या आणि दिवे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या मेणबत्त्या फुलांचे, खाद्यपदार्थांचे आणि इतर आकर्षक वस्तूंच्या आकारांत तयार करण्यात आल्या आहेत. लाडू कँडल, चहा-बिस्किट कँडल, आईस्क्रीम कँडल यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रकारांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. या सर्व मेणबत्त्या सुगंधित असून घरात प्रसन्न, उत्सवी वातावरण निर्माण करतात.
advertisement
दुकानात ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार रंग, सुगंध आणि आकारांमध्ये कस्टमाइज्ड कँडल्स तयार करून दिल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी काहीतरी हटके आणि विशेष सजावट किंवा भेटवस्तू शोधत असाल, तर या मेणबत्त्या परिपूर्ण पर्याय ठरू शकतात.
किंमतीच्या बाबतीत या मेणबत्त्या 30 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत विविध रेंजमध्ये उपलब्ध आहेत. फ्लॉवर कँडल्स 30 ला, जेल वॅक्स कँडल्स 90 ला, टी कप कँडल्स 120 ला, गोलाकार जार कँडल्स 210-280 पर्यंत, तर लाडू व चहा-बिस्किट कँडल्स 150-250 रुपयांमध्ये मिळतात.
advertisement
विशेष म्हणजे या मेणबत्त्यांचा वापर केवळ दिवाळीपुरताच मर्यादित नाही. घराच्या दररोजच्या सजावटीसाठी, खास प्रसंगांमध्ये वातावरण निर्मितीसाठी किंवा मेडिटेशन, योगा आणि रीलॅक्सेशनसाठीही या सुगंधित मेणबत्त्या वापरता येतात. त्यामुळे दिवाळीनंतरही या मेणबत्त्यांना घरामध्ये एक वेगळीच शोभा प्राप्त होते.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 03, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Business Ideas : दिवाळीत करा घरीच बिझनेस, 30 रुपयांना घ्या अन् 50 ला विका! ठाण्यात इथं करा खरेदी, Video