'चहलला लग्नाची घाई होती, मला वाटलं...', लग्नाचे दिवस आठवताना धनश्री वर्माला अश्रू अनावर, सांगितलं नेमकं काय घडलं?

Last Updated:
Dhanashree Verma in Rise and Fall reality show : राईज अँड फॉल शोमध्ये धनश्री वर्मा तिच्या युजवेंद्र चहलसोबतच्या लग्न आणि घटस्फोटाच्या आठवणी शेअर करत भावूक झाली. अर्जुन बिजलानीने दिला आधार.
1/8
मुंबई: सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत असलेली क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची एक्स-वाईफ धनश्री वर्मा शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहे.

advertisement
2/8
शोमध्ये ती वारंवार चहलसोबतच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलत असल्यामुळे ती ट्रोलही होत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये धनश्रीला जुन्या आठवणी सांगताना अश्रू आवरले नाहीत आणि सह-स्पर्धक अर्जुन बिजलानीने तिला भावनिक आधार दिला.

3/8
अर्जुन बिजलानीने धनश्रीला तिच्या प्रेमविवाहाबद्दल विचारले असता, तिने हसून उत्तर दिले, “माझं लव्ह-अरेंज होतं. सुरुवात अरेंज म्हणून झाली.”

4/8
२०२० मध्ये युजवेंद्र चहलसोबत लग्नबंधनात अडकलेली धनश्री म्हणाली, “मला लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता. पण चहलला खूप घाई होती. त्याला मला डेट न करताच थेट लग्न करायचं होतं.”

5/8
पुढे ती म्हणाली, “त्याने मला इतकं प्रेम दिलं की, मला वाटलं लग्न करावं. दोघांचा ऑगस्टमध्ये रोका झाला आणि डिसेंबरमध्ये लग्न केले. लग्नानंतर लगेचच मी त्याच्यासोबत प्रवास करू लागले आणि एकत्र राहू लागले. याच काळात तिला नात्यात काही लहान-सहान बदल जाणवत होते, असेही तिने सांगितले.

6/8
जुने दिवस आणि नात्यातील बदलांबद्दल बोलताना धनश्री अचानक भावूक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे पाहताच अर्जुन बिजलानीने तिचे अश्रू पुसले आणि तिला धीर दिला.

7/8
धनश्रीने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत गंमतीत म्हटले, “मी इतकी छान तयार झाली आहे, टिकली लावली आहे.” त्यावर अर्जुननेही तिला सावरण्यासाठी उत्तर दिले की, “इंडियन ब्युटीच्या डोळ्यांत थोडे अश्रू चांगले दिसतात.”

8/8
या शोमध्ये वारंवार खासगी आयुष्यावर बोलल्यामुळे काही चाहते धनश्रीला 'सिम्पथी मिळवण्यासाठी रडतेय’ म्हणून ट्रोल करत आहेत, तर चहलने अजूनही या प्रकरणावर मौन बाळगले आहे.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement