लावणाची लंका म्हणजे श्रीलंकामध्ये कसा साजरा होतो दसरा? समोर आल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी असा प्रश्न पडलाय का की रावणाच्या लंकेत, म्हणजेच श्रीलंकेत हा सण कसा साजरा केला जातो?
मुंबई : दसरा म्हटलं की भारतात साजरा केला जातो रावण दहन. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता त्यामुळे संपूर्ण भारतात असाच दसरा साजरा केला जातो. रावण दहन म्हणजे सत्याच्या विजयाचं प्रतीक, आणि रामाच्या विजयाची गाथा साजरी केली जाते. पण कधी असा प्रश्न पडलाय का की रावणाच्या लंकेत, म्हणजेच श्रीलंकेत हा सण कसा साजरा केला जातो? खरंतर श्रीलंकेत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, ज्यामध्ये रावणाचं दहन होत नाही.
इथं विशेषतः तमिळ समाजात दसऱ्याला देवीची आराधना, परंपरा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. त्यामुळे भारताप्रमाणे इथे रावण दहनाची प्रथा नाही. कारण श्रीलंकेतील लोककथांमध्ये रावणाला पराक्रमी राजा, महान शिवभक्त, विद्वान आणि आयुर्वेदाचा ज्ञाता म्हणून मान दिला जातो.
श्रीलंकेत दसरा कसा साजरा होतो?
श्रीलंकेत दसरा भव्य स्वरूपात नाही, तर धार्मिक विधी, देवी पूजन आणि सामुदायिक कार्यक्रमांद्वारे साजरा होतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. जाफना, त्रिंकोमली, बतिकलोआ अशा तमिळबहुल भागांत मंदिरांमध्ये आरती, अनुष्ठानं आणि विशेष धार्मिक कार्यक्रम होतात. भारताप्रमाणेच इथेही औजारं, शस्त्रं आणि वाहनांची पूजा करण्याची परंपरा आहे.
advertisement
विद्यारंभम परंपरा
तामिळ संस्कृतीच्या प्रभावामुळे श्रीलंकेतही विजयादशमीचा दिवस शिक्षणारंभासाठी शुभ मानला जातो. लहान मुलांना या दिवशी पहिलं अक्षर लिहायला शिकवलं जातं. यालाच ‘विद्यारंभम’ म्हणतात. या दिवशी सरस्वती पूजन करून मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना केली जाते.
रावण दहन का होत नाही?
भारतामध्ये रावणाला वाईटाचं प्रतीक मानलं जातं, पण श्रीलंकेत रावणाला वीर योद्धा आणि महान राजा म्हणून गौरवण्यात आलं आहे. स्थानिक कथांनुसार रावणाने लंकेला समृद्ध केलं, आयुर्वेदाचं ज्ञान दिलं आणि तो शिवभक्त होता. त्यामुळे इथे रावणाला खलनायक न मानता नायक मानलं जातं. रावण दहन केल्यास लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं मानलं जातं. म्हणूनच श्रीलंकेत दसरा म्हणजे रामाच्या विजयाचं स्मरण नव्हे, तर देवीपूजा, शस्त्रपूजन आणि शिक्षणारंभाचं प्रतीक आहे.
advertisement
श्रीलंकेत कुठे कुठे साजरा होतो दसरा?
कोलंबो : राजधानीत मंदिरे, रामायणावर आधारित नाटकं, नृत्यप्रदर्शन आणि धार्मिक सोहळे होतात.
कॅंडी : पारंपरिक संगीत, जुलूस आणि भक्तीसभांमुळे इथं ऐतिहासिक आणि धार्मिक वातावरण निर्माण होतं.
नुवारा एलिया : ‘लिट्ल इंग्लंड’ म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण रामायण पथाशी जोडलेलं आहे. दसऱ्यात इथं रावण आणि लंकेशी निगडित अनुष्ठानं आणि कथावाचन होतात.
advertisement
त्रिंकोमली : कोनेश्वरम मंदिरात भव्य धार्मिक कार्यक्रम आणि जुलूस आयोजित केले जातात.
जाफना : हिंदू परंपरेचं प्रमुख केंद्र असलेल्या या शहरात दसरा मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो. मंदिरातील पूजाअर्चा, सामुदायिक कार्यक्रम यामुळे वातावरण भक्तिमय होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/देश/
लावणाची लंका म्हणजे श्रीलंकामध्ये कसा साजरा होतो दसरा? समोर आल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतात