10 Disadvantages of Buying a Car : GST कमी झाली म्हणून कार घेण्याचा विचार करताय? मग आधी होणारे 10 नुकसान जाणून घ्या

Last Updated:
मात्र कार घेणं म्हणजे छोटा खर्च नाही. त्यामागे अनेक आर्थिक, सामाजिक आणि मानसिक बाबी जोडलेल्या असतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार खरेदी ही मोठी जबाबदारी असते.
1/14
एक असा काळ होता जेव्हा गरज असेल तरच लोक कार विकत घेत होते. पण आता कार स्टेटस सिम्बॉल झाल्यामुळे सगळेच लोक ते विकत घेतात. काही लोकांची तर वर्षाची कमाई कारच्या किंमती एवढी नसते, तरी देखील स्टेटस दाखवायला म्हणून लोक ते विकत घेतात.

advertisement
2/14
मात्र कार घेणं म्हणजे छोटा खर्च नाही. त्यामागे अनेक आर्थिक, सामाजिक आणि मानसिक बाबी जोडलेल्या असतात. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कार खरेदी ही मोठी जबाबदारी असते. त्यामुळे कार खरेदी करण्याआधी तिचे फायदे-तोटे नीट विचारात घेणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊया कार खरेदीचे काही मोठे तोटे.

3/14
समस्या 1 : उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्चभारतामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबं कार खरेदी करत असली, तरी त्यातील बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या जवळपास 30% हिस्सा कार खरेदीवर खर्च होतो. त्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती वेगळ्याच. जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या मायलेज आणि प्रत्यक्षात मिळणाऱ्या मायलेजमध्येही मोठा फरक असतो.

4/14
समस्या 2 : कर्जाचा बोजाबहुतांश लोक कार लोन घेऊन गाडी खरेदी करतात. 6 लाखांच्या कारसाठी घेतलेलं कर्ज 6 वर्षे फेडताना जवळपास 7.2 लाख रुपये खर्च करावे लागतात. म्हणजेच व्याजदराच्या ओझ्यामुळे कर्ज हे दलदल बनतं आणि माणूस त्यात आणखी अडकतो.

5/14
समस्या 3 : कराचा भारकारच्या किंमतीत तब्बल 74% पर्यंत कर असतो. म्हणजेच 6 लाखांच्या गाडीवर जवळपास 4.44 लाख रुपये कर भरावा लागतो. हे मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी मोठं ओझं आहे.

6/14
समस्या 4 : विमा खर्चदरवर्षी कारसाठी 20 ते 50 हजार रुपये विमा खर्च करावा लागतो. विमा न घेतल्यास नुकसान भरून काढणं अशक्य होतं.

7/14
समस्या 5: दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगभारतीय रस्त्यांच्या परिस्थितीमुळे कारचे पार्ट्स लवकर खराब होतात. महिन्याला सरासरी 5,000 रुपये दुरुस्तीवर खर्च होतात. सर्व्हिसिंगचं बिल अनेकदा झटक्यात बजेट बिघडवतं.

8/14
समस्या 6: प्रतिष्ठेचा प्रश्नकारला डेंट आला की तो काढून घेणं महत्वाचं होतं. कारण लोक त्यावरून विनोद करतात. पण त्यासाठी पुन्हा हजारो रुपये खर्च करावे लागतात. विमा कंपन्याही नुकसानभरपाई देताना अनेक सबबी शोधतात.

9/14
समस्या 7 : पार्किंग आणि ट्रॅफिकशहरात पार्किंग ही मोठी समस्या आहे. पार्किंगची जागा नसेल तर गाडी चोरीला जाणं किंवा नुकसान होणं सोपं असतं. शिवाय शहरातील ट्रॅफिकमुळे इंधन जास्त खर्च होतं. टोलचे वेगळे खर्च येतात.

10/14
समस्या 8: सरकारी योजनांचा लाभ बंदकार खरेदी केल्यावर सरकारच्या काही योजना, जसं की पेंशन, राशन या थांबतात. सरकार कारवाल्यांना गरीब समजत नाही. त्यामुळे अप्रत्यक्ष तोटा होतो.

11/14
समस्या 9: गुंतवणुकीवर परतावा नाही6 लाख रुपये कारवर खर्च केल्यास काहीही उत्पन्न मिळत नाही. पण तोच पैसा FD मध्ये गुंतवला तर दरमहा 3,000 रुपये व्याज मिळू शकतं. शिवाय स्वस्त कारमध्ये एअरबॅग, एसी, बॅक कॅमेरा यांसारख्या सुविधा नसतात.

12/14
समस्या 10: मॉडेल जुने होणेदरवर्षी कारचे नवे मॉडेल्स बाजारात येतात. त्यामुळे एक वर्षातच तुमची कार जुनी होते. अपग्रेड करायचा असेल तर पुन्हा लाखोंचा खर्च करावा लागतो.

13/14
काय पर्याय आहेत?कारच्या ऐवजी दुचाकी खरेदी करणं हा सोपा पर्याय आहे. ती कारपेक्षा 70% स्वस्त पडते. किंवा सार्वजनिक वाहतूक. बस, मेट्रो, ऑटो, कॅब सेवा   हा आणखी चांगला पर्याय आहे.

14/14
कार खरेदी करणं म्हणजे फक्त प्रतिष्ठा नाही तर मोठा आर्थिक बोजा आहे. जर तुम्हाला या सर्व जबाबदाऱ्या पेलणं शक्य असेल, तर कार खरेदी करा. पण निर्णय घेण्याआधी फायदे-तोटे नीट समजून घ्या.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement