रस्त्यावर सापडली गंगाधरची डेडबॉडी, भारतातला सगळ्यात मोठा इन्श्युरन्स स्कॅम, प्लान पाहून पोलीसही शॉक

Last Updated:

दिव्यांग व्यक्तीची हत्या करून त्याच्या नावावर घेतलेल्या 5.2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीवर डल्ला मारण्याच्या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे.

रस्त्यावर सापडली गंगाधरची डेडबॉडी, भारतातला सगळ्यात मोठा इन्श्युरन्स स्कॅम, प्लान पाहून पोलीसही शॉक
रस्त्यावर सापडली गंगाधरची डेडबॉडी, भारतातला सगळ्यात मोठा इन्श्युरन्स स्कॅम, प्लान पाहून पोलीसही शॉक
दिव्यांग व्यक्तीची हत्या करून त्याच्या नावावर घेतलेल्या 5.2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीवर डल्ला मारण्याच्या धक्कादायक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. आरोपींनी दिव्यांग व्यक्तीच्या पॉलिसीचे पैसे घेण्यासाठी त्याची हत्या करून रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. एवढच नाही तर आरोपींनी त्यांच्याच टोळीतील एका महिलेला दिव्यांग व्यक्तीची पत्नीही दाखवण्यात आलं. मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव गंगाधर असून तो 34 वर्षांचा आहे. 3 वर्षांपूर्वी स्ट्रोक आल्यामुळे तो शरिराच्या डाव्या बाजूचा वापर करू शकत नव्हता. 28 सप्टेंबर रोजी गंगाधरचा मृतदेह संदूर रोडवर आढळून आला. सुरूवातीला हे प्रकरण हिट ऍन्ड रनचे असल्याचं पोलिसांना वाटलं, पण गंगाधरकडे दुचाकी नसल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यांचा संशय वाढला.
advertisement

हिट-अँड-रनचा बनाव

'28 सप्टेंबरला आम्हाला सकाळी 5.30 वाजता संदूर रोडवर हिट-अँड-रन प्रकरणाबद्दल फोन आला. मी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली आणि योग्य प्रक्रिया करून मृतदेह हलवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर गंगाधरच्या पत्नीला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले. पत्नीने गंगाधरकडे दुचाकी नसल्याचं स्पष्ट केलं, त्यामुळे आमचा संशय वाढला', असी माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
टोळीने गंगाधरच्या नावाने कोट्यवधींची पॉलिसी काढली होती आणि यामध्ये त्यांनी निंगम्मा नावाच्या महिलेला त्याची बनावट पत्नी दाखवलं होतं. याच टोळीने गंगाधरची हत्या केली आणि त्याचा मृतदेह शहराच्या बाहेरील भागात नेला. गंगाधरचा मृतदेह त्यांनी दुचाकीवर ठेवला आणि नंतर अपघात झाल्याचं दाखवण्यासाठी तो कारने धडकवला.

सहा जणांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी गंगाधरची पत्नी असल्याचा खोटा दावा करणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक केली आहे. गंगाधरची पत्नी असल्याचा खोटा दावा करणाऱ्या महिलेचं नाव हुलिगेम्मा आहे. याशिवाय पोलिसांनी कृष्णप्पा, रवी, अजय, रियाज आणि योगराज सिंग यांनाही अटक केली आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार आणि मोपेडही पोलिसांनी जप्त केली आहे. कर्नाटकच्या होस्पेटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या टोळीने अशाप्रकारे कुणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास होणं गरजेचं आहे.
advertisement
ही टोळी बेघर आणि गंभीर आजारी किंवा अपंगत्व असलेल्या लोकांना हेरते आणि त्यांच्या नावावर बँक खाती उघडते. यानंतर त्यांच्या नावावर 40-50 लाखांच्या पॉलिसी काढली जाते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर टोळी विम्याचे पैसे घेते, यातल्या एका रकमेचा भाग बनावट वारसदाराला दिला जातो. सध्या सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांबद्दल आम्ही विमा कंपनीसोबत संपर्कात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या टोळीने अशाप्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
रस्त्यावर सापडली गंगाधरची डेडबॉडी, भारतातला सगळ्यात मोठा इन्श्युरन्स स्कॅम, प्लान पाहून पोलीसही शॉक
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement