VIDEO : नमाजच्या रांगेत चुकून घुसला... सगळ्यांनी मिळून चाचाला चोपला, पोलिसांसमोरच दोन गटात तुफान राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एक व्यक्ती नमाजच्या रांगेत चुकून घुसल्यामुळे दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.
Kalyan News : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एक व्यक्ती नमाजच्या रांगेत चुकून घुसल्यामुळे दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस उभे असतानाच हे दोन्ही गड भिडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील आनंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. शुक्रवारी मशिदीत मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी आले होते.मशिदीत गर्दी असल्याने रांग लागली होती. दरम्यान एक व्यक्ती हा नंबर सोडून नमाज पठण करण्यासाठी जात असताना काही मुस्लिम तरुणांनी त्याला रोखले. या दरम्यानच दोन गटात राड्याला सुरवात झाली.
advertisement
त्याचं झालं असं की दोन्ही गटातील तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने पहिल्या क्रमांकावर नमाज पठण करण्यासाठी वरचढ सुरू झाली.याच कारणाने सुरुवातीला बाचाबाची सूरू झाली. त्यानंतर दोन गट आपआपसात भिडले.या राड्यात एका व्यक्तीला बेदम चोप देण्यात आला होता. विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस देखील कर्तव्यावर होते. यावेळी त्यांनी लगेच राडा थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 03, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : नमाजच्या रांगेत चुकून घुसला... सगळ्यांनी मिळून चाचाला चोपला, पोलिसांसमोरच दोन गटात तुफान राडा