रायपूर : सकाळचा चहा अनेकजणांच्या सवयीचा असतो. बरेचजण तर तल्लफ येईल तेव्हा चहा घेतात, मग दिवसभरातून ४-५ कप का होईना. परंतु चहा हा आरोग्यासाठी धोकादायक असतो. त्यात उपाशीपोटी चहा घेणं अतिशय धोक्याचं असतं, असं डॉक्टर सांगतात. परंतु घाबरू नका, यामुळे तुम्हाला चहा सोडण्याची गरज नाही. आज आपण असा एक चहा पाहणार आहोत जो आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
advertisement
छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातल्या कृषी शास्त्रज्ञांनी हा चहा तयार केला आहे. जो पौष्टिक गुणधर्मांनी अत्यंत परिपूर्ण आहे. 'मुनगा चाय' असं त्याचं नाव. प्राध्यापक डॉ. भागवत शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात तब्बल 10 वर्ष संशोधन केल्यानंतर हा चहा तयार करण्यात आला. भाभा परमाणू अनुसंधान केंद्र, मुंबईच्या सहकार्याने हा चहा बनवल्याचं त्यांनी सांगितलं.
Health Tips : गॅस, ऍसिडिटीपासून 2 मिनिटांत मिळेल आराम, घ्या चार पदार्थांनी बनवलेलं होममेड ड्रिंक
या चहामुळे शरिरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. शिवाय साखरही नियंत्रणात राहते. अन्नपचन सुरळीत होतं. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी, शरीर ऊर्जावान ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त असतो.
High Blood Pressure : तुमचे डोळेही देतात ब्लड प्रेशर वाढल्याचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात
लिंबू आणि वेलची अशा दोन फ्लेव्हरमध्ये हा चहा मिळतो. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात या चहाचा 100 ग्रॅम पॅकेट 120 रुपयांना उपलब्ध आहे. ग्रीन टी, लेमन ग्रास अशा विविध पदार्थांपासून हा चहा तयार करण्यात आलाय.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g