High Blood Pressure : तुमचे डोळेही देतात ब्लड प्रेशर वाढल्याचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Last Updated:

ब्लड प्रेशर वाढलं की डोळ्यांमध्ये बदल जाणवतात. तेव्हा होणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

 तुमचे डोळेही देतात ब्लड प्रेशर वाढल्याचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात
तुमचे डोळेही देतात ब्लड प्रेशर वाढल्याचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात
हाय ब्लड प्रेशर ही माणसांच्या आरोग्याशी निगडित असणारी एक वाढती समस्या आहे. शरीरात ब्लड प्रेशर वाढलं की त्याचा डोळ्यांवर देखील परिणाम होतो. ब्लड प्रेशर वाढल्यास डोळ्यांमध्ये त्याची काही लक्षण जाणवू लागतात. शरीरात ब्लड प्रेशर वाढल्याने रेटिनाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना नुकसान पोहोचते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं की डोळ्यांमध्ये बदल जाणवतात. तेव्हा होणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
हाय ब्लड प्रेशरचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो?
1. हाय ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचते.
2. हाय ब्लड प्रेशरमुळे रेटिनाला रक्ताचा अपुरा पुरवठा होतो.
3. डोळयातील पडद्यापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये अडथळा देखील येऊ शकतो.
advertisement
हाय ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांमध्ये कोणती लक्षणं जाणवतात : 
एक गोष्ट दोनदा दिसणे : ब्लड प्रेशर वाढल्याने डोळ्यांनी तुम्हाला एक गोष्ट दोनदा दिसू लागते. जर तुमच्या डोळ्यांमध्ये देखील अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जावे आणि योग्य उपचार करावेत.
धुरकट दिसणे : ब्लड प्रेशर खूप जास्त वाढल्याने डोळ्यांनी धुरकट दिसू लागते. असे लक्षण जाणवल्यास तुम्ही वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
advertisement
डोकं दुखणे : ब्लड प्रेशर वाढल्याने डोळ्यांभोवती वेदना होणे, डोकं दुखणे असा त्रास जाणवतो समस्या होतात. हे ब्लड प्रेशरचे एक गंभीर लक्षण आहे तेव्हा अशी लक्षण जाणवल्यास डॉक्टरांकडे जावे आणि योग्य उपचार करून घ्यावेत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
High Blood Pressure : तुमचे डोळेही देतात ब्लड प्रेशर वाढल्याचे संकेत, दुर्लक्ष करणं पडेल महागात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement