पीलीभीत : अनेकदा आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा काही पदार्थ आपल्याला खाऊ देत नाहीत. त्यामागे बऱ्याचदा पोट बिघडेल हेच कारण असतं. तर तज्ज्ञ फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि आयर्न असतं. परंतु काही फळं एकत्र खाणं आरोग्यासाठी घातकही ठरू शकतं. त्यामुळे अपचन होऊ शकतं. त्यापैकीच एक आहे लिंबू आणि पपई.
advertisement
पपईमध्ये फायबर, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी, ए, इ, बी, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, अल्फा आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी होण्यासह विविध आजारांवर पपई रामबाण असते. शिवाय पचनशक्ती मजबूत होण्यासाठीही पपई उपयुक्त ठरते. परंतु ती लिंबासोबत कधीच खाऊ नये.
गरोदरपणात दररोज प्यावा हा ज्यूस, चेहरा दिसेल प्रसन्न, बाळ होईल सुदृढ
आयुर्वेदाचार्य डॉ. आदित्य पांडे सांगतात की, पपई आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु कोणताही पदार्थ प्रमाणात खावा, नाहीतर त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. पपईत पपैन नावाचं तत्त्व असतं, जे जास्त प्रमाणात पोटात गेल्यास शरिरावर सूज येऊ शकते, एलर्जी होऊ शकते, चक्करही येऊ शकते.
गोड जिलेबी आवडत नाही? मग तिखट खा, चहामध्ये बुडवून लागते एकदम भारी!
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबासोबत पपई खाणं हानीकारक मानलं जातं कारण या दोन पदार्थांच्या मिश्रणामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण बिघडतं. शिवाय ऍनिमिया आणि ऍसिडिटीचा त्रासही होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा