गरोदरपणात दररोज प्यावा हा ज्यूस, चेहरा दिसेल प्रसन्न, बाळ होईल सुदृढ

Last Updated:

गरोदरपणात अनेकदा शरिरात ऊर्जेची कमतरता जाणवते. अशावेळी हा ग्लासभर रस प्यायल्यास शरीर छान ऊर्जावान राहतं. शिवाय यामुळे शरीर हायड्रेटेडही होतं.

त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियमसह विविध गुणधर्म असतात.
त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियमसह विविध गुणधर्म असतात.
अर्पित बडकुल, प्रतिनिधी
दमोह : गरोदरपणात आहाराबाबत काही पथ्य पाळणं आवश्यक असतं. या काळात फळं आणि भाज्या मोठ्या प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. या नऊ महिन्यांमध्ये जरा जरी हलगर्जीपणा झाला तरी त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होते. त्यामुळे त्याची शारीरिक, मानसिक वाढ खुंटू शकते.
आयुर्वेदिक डॉक्टर अनुपमा वर्मा सांगतात की, ऊस पौष्टिक गुणांनी परिपूर्ण असतं. गरोदरपणात ऊस खाणं सुरक्षित मानलं जातं. त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियमसह विविध गुणधर्म असतात. गरोदरपणात अन्नपचनासंबंधी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ऊसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय गरोदरपणात महिलांना फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमची प्रचंड गरज असते. शरिराची हीच गरज ऊसाच्या रसामुळे पूर्ण होते.
advertisement
ऊसाचा गोडवा ठेवतो शरीर ऊर्जावान!
गरोदरपणात अनेकदा शरिरात ऊर्जेची कमतरता जाणवते. अशावेळी ग्लासभर ऊसाचा रस प्यायल्यास शरीर छान ऊर्जावान राहतं. शिवाय यामुळे शरीर हायड्रेटेडही होतं. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने गरोदरपणात सर्दी, खोकला आणि तापासारखे साथीचे आजार होण्याची शक्यता कमी होते. बाळ आणि आईच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं अत्यंत आवश्याक असतं.
advertisement
दरम्यान, ऊसाचा रस केवळ गरोदरपणातच नाही, तर नियमित आयुष्यातही शरिरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे त्वचेवर तुकतुकीतपणा निर्माण होतो आणि चेहऱ्यावर छान तेज येतं. शिवाय ऊसात असणारं फॉलिक ऍसिड मेंदूच्या विकासासाठी उपयोगी असतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गरोदरपणात दररोज प्यावा हा ज्यूस, चेहरा दिसेल प्रसन्न, बाळ होईल सुदृढ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement