...म्हणून बायको आई होऊ शकत नाही! लग्नाचं वय असतं कारणीभूत

Last Updated:

अगदी काही महिन्यांपूर्वी लग्न झालेली जोडपीही मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेत असल्याची उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो. परंतु कितीही उपचार घेतले तरीही अनेकजणांना आई-वडील होण्याचं सुख मिळत नाही.

(हा फोटो काल्पनिक आहे. सौजन्य : Canva)
(हा फोटो काल्पनिक आहे. सौजन्य : Canva)
रजनीश यादव, प्रतिनिधी
प्रयागराज : एका जीवाला जन्म देणं ही स्त्रीला लाभलेली सर्वात सुंदर देणगी आहे. आई होणं हे जवळपास प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. मग त्यासाठी स्वतःचंच बाळ असायला हवं असं काही नाही, आपण कोणालाही आईसारखा जीव लावू शकतो. परंतु आपल्या शरिरात एका जीवाची चाहूल लागणं, आपण त्याला नऊ महिने पोटात वाढवणं, आनंदाच्या असंख्य कळा सोसून त्याला जन्म देणं, जन्माला आल्यावर त्याला जीवापाड जपणं यासारखं दुसरं सुख असूच शकत नाही. परंतु दुर्दैवाने ते सर्वांच्याच नशिबात नसतं.
advertisement
अगदी काही महिन्यांपूर्वी लग्न झालेली जोडपीही मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेत असल्याची उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो. परंतु कितीही उपचार घेतले तरीही अनेकजणांना आई-वडील होण्याचं सुख मिळत नाही. रिपोर्टमध्ये सारंकाही उत्तम असतं, मग नेमकी अडचण काय आहे, हेसुद्धा कळत नाही. आज आपण यामागची काही संभाव्य कारणं जाणून घेणार आहोत.
advertisement
बाळ न होण्याचं मुख्य कारण काय?
स्त्रीरोग विशेषज्ज्ञ डॉक्टर वंदना बंसल सांगतात की, सध्या सर्वजण करियरबाबत प्रचंड सिरियस असतात. आधी करियर मग लग्न, ही विचारसरणी तरुणांमध्ये बऱ्यापैकी रुजली आहे. त्यात वय वाढत जातं आणि ताण-तणाव येतो तो वेगळाच. वयाच्या तिसाव्या वर्षानंतर महिलेची प्रजनन क्षमता कमी होते. 35 वर्षांनंतर ती फार कमी असते. महिलांमध्ये एस्ट्रोजन हॉर्मोनचं प्रमाण कमी होऊ लागतं. ते व्यवस्थित राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
advertisement
लग्नासाठी योग्य वय काय?
डॉ. वंदना सांगतात की, वयाच्या जास्तीत जास्त 25 ते 28 वर्षांपर्यंत लग्न करावं. दोघांनाही बाळ हवं असेल, तर ते वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत होईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर दुसरं बाळ हवं असेल तर आपण आरामात वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत त्याचा विचार करू शकता.
advertisement
खरंतर आयुष्यात कधी काय करावं, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. लग्नासाठी, मूल होण्यासाठी असं कोणतं आयडियल वय नाही, मात्र हॉर्मोन्सच्या दृष्टीने लग्नासाठी वय वर्ष 25 हा उत्तम काळ मानला जातो. तोपर्यंत स्त्रीमध्ये सेक्स करण्याची तीव्र भावना असते.
प्रजनन क्षमता सुदृढ कशी ठेवावी?
प्रजनन क्षमता उत्तम ठेवणं हे आजकालच्या धावपळीच्या जीवनात एक मोठं आव्हान झालंय. कारण आपलं जीवन घड्याळावर चालतं, आपल्याला वेळच्या वेळी जेवण्याचीही मुभा नसते. परंतु म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, शेवटी सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. प्रजनन क्षमता उत्तम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात असायला हवा. नियमितपणे व्यायाम करायला. शिवाय जंक फूड खाणं टाळावं.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
...म्हणून बायको आई होऊ शकत नाही! लग्नाचं वय असतं कारणीभूत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement