चमोली : कायम तरुण राहावं, सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत. त्यासाठी आपण चांगल्या दर्जाचे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतो. अनेकजण आपली कमाईचा काही भाग त्यावरच खर्च करतात. परंतु तरीही काही फरक पडत नाही. म्हणूनच आज आपण यावर एक अत्यंत सोपा आणि रामबाण उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचं वय वाढेल पण ते चेहऱ्यावर आणि शरिरावर दिसणार नाही.
advertisement
'कॅमोमाइल' ही पांढऱ्या रंगाची फुलं दिसायला अत्यंत सुरेख दिसतात. कदाचित आपण हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, मात्र वजन कमी करण्यासाठी या फुलांचा चहा म्हणजेच कॅमोमाइल चहा सर्रास प्यायला जातो. ही फुलं सुकवूनही आपण त्यांचा वापर विविध आजारांवर करू शकता. विशेषतः मासिकपाळीदरम्यान महिलांना होणाऱ्या वेदनांवर हा चहा उपयुक्त असतो. शिवाय त्यामुळे मानसिक ताण-तणावही दूर होतो. काही महिलांना मासिकपाळीत इतका त्रास होतो की, संपूर्ण दिवस त्यांना त्या दुखण्यातच घालवावा लागतो. परंतु या चहामुळे आपली पाळी कधी येते आणि कधी जाते हेसुद्धा कळत नाही, असं तज्ज्ञ सांगतात.
कितीही घासले दात, तरी तोंडाचा येतो वास? ही तर श्वासांची दुर्गंधी! 'अशी' करा झटक्यात दूर
उत्तराखंडमधील वनस्पती विज्ञानाचे प्राध्यापक वीपी भट्ट यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, कॅमोमाइल ही प्राचीन वनस्पती आहे. तिचा वापर विविध आजारांवर होतो. या वनस्पतीच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. शिवाय त्यात अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात. ज्यामुळे त्वचा छान तुकतुकीत आणि तजेलदार राहते. त्वचेतील सर्व घाण आणि विषाणूदेखील यामुळे बाहेर पडतात. तसंच यातील हायपोएलर्जिक गुणधर्मामुळे त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.
चहा सोडायची काहीच गरज नाही, 'हा' एक कप प्या आणि सुदृढ राहा!
कॅमोमाइल फुलांमुळे केवळ त्वचा सुदृढ राहत नाही, तर पोटाचे विकारही दूर होतात, स्थूलपणा दूर होतो, चिंता, भिती दूर होऊन मन शांत राहतं. त्याचबरोबर कॅमोमाइलमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. या खास औषधी गुणधर्मांमुळेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह अनेक भागांमध्ये कॅमोमाइलची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपण घरातही या वनस्पतीची लागवड करू शकता. ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा कालावधी त्यासाठी पोषक मानला जातो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा