बऱ्याचदा योग्य माहिती नसल्यानं हे उपाय वापरले जातात, ज्यामुळे कोणताही फायदा होण्याऐवजी वेदना वाढतात. अशा परिस्थितीत, कोणत्या प्रकारच्या वेदनांसाठी कोणतं औषध वापरावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तोच प्रकार हॉट वॉटर बॅग आणि आईस बॅगला लागू पडतो.
हॉट कॉम्प्रेस बॅग किंवा हॉट वॉटर बॅगचा वापर कधी करावा ?
हॉट कॉम्प्रेसमुळे रक्ताभिसरण वाढतं आणि स्नायूंत आलेला ताठरपणा कमी होतो. यामुळे दीर्घकालीन वेदना, स्नायूंचा ताठरपणा आणि ताण यामध्ये खूप आराम मिळतो. बऱ्याच काळापासून असलेली कंबरदुखी किंवा पाठदुखी असेल तर हॉट कॉम्प्रेस लावा. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.
advertisement
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी हॉट कॉम्प्रेस वापरा, यामुळे पायातले पेटकेही कमी होण्यासाठी मदत होते. मान मुरगळली असेल किंवा ताण जाणवत असेल तर गरम कॉम्प्रेसमुळे आराम मिळतो.
कोल्ड कॉम्प्रेस किंवा आईस बॅगचा वापर कधी करावा?
कोल्ड कॉम्प्रेसमुळे सूज आणि जळजळ कमी होते. ताजी जखम, मुरगळणं किंवा सूज आली असेल तर कोल्ड कॉम्प्रेसमुळे लवकर आराम मिळतो. खांदा दुखत असेल किंवा सूज येत असेल, तर या भागावर बर्फाचा पॅक लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होईल. त्याच वेळी, गुडघेदुखीसाठी कोल्ड कॉम्प्रेस अधिक फायदेशीर आहे,
Acidity : अॅसिडिटीनं होणाऱ्या पोटदुखीवर औषध, डॉक्टरांनी सुचवलेत पाच घरगुती उपाय
या गोष्टी लक्षात ठेवा -
जखम ताजी असेल किंवा सूज असेल तर नेहमी प्रथम कोल्ड कॉम्प्रेस लावा.
जुनाट वेदना किंवा स्नायूंमधे ताठरता आली असेल तर गरम कॉम्प्रेस लावा.
गरम किंवा खूप थंड पॅक त्वचेवर थेट लावू नयेत.
गरम किंवा बर्फाचा पॅक प्रथम कापडात गुंडाळा, जेणेकरून जळजळ होणार नाही किंवा त्वचेचं नुकसान होणार नाही. वेदना खूप जास्त असतील आणि बराच काळ बरं होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे.
