काही सोप्या घरगुती टिप्सच्या मदतीनं तुम्ही नखं खोलवर स्वच्छ करू शकता आणि त्यांना नैसर्गिकरित्या चमक देऊ शकता. यासाठी कोमट पाणी, संत्र्याचा रस, शॅम्पू, बेसन आणि लिंबाच्या रसाची पेस्ट हे जिन्नस उपयुक्त ठरतात.
कोमट पाणी - पायाच्या नखांच्या स्वच्छतेसाठी कोमट पाणी हा चांगला पर्याय आहे. यासाठी तुमचे पाय पंधरा ते वीस मिनिटं कोमट पाण्यात बुडवा. यानंतर, ब्रशनं स्वच्छ करा. यामुळे साचलेली धूळ निघायला मदत होईल.
advertisement
Digestion : थंडीच्या दिवसात खा या भाज्या, आतड्यांचं काम होईल सुलभ
एपल व्हिनेगर - थोडंसं एपल व्हिनेगर पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. या द्रावणात नखं सुमारे पंधरा मिनिटं भिजवा. यामुळे नखांमधील अस्वच्छता निघून जाईल.
संत्र्याचा रस - नखांच्या स्वच्छतेसाठी अंड्याचा पांढरा भाग संत्र्याच्या रसात पूर्णपणे मिसळा. हे मिश्रण तुमच्या नखांना लावा आणि थोड्या वेळानं ते धुवा. यामुळे नखांना नैसर्गिक चमक मिळू शकते.
Health Tips : अशक्तपणा घालवण्यासाठी प्या काढा, ऐका आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला
शॅम्पू - पायांची नखं स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू वापरू शकता. कोमट पाण्यात थोडासा शॅम्पू मिसळा. या मिश्रणात पाय थोडा वेळ बुडवा. त्यानंतर, ब्रशनं नखं स्वच्छ करा आणि स्क्रब करा. यामुळे नखं चमकदार होऊ शकतात.
बेसन आणि लिंबाच्या रसाची पेस्ट - नखांचा पिवळेपणा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. यासाठी, बेसन आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट नखांना लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर, तुमचे पाय कोमट पाण्यानं धुवा. यामुळे नखं पूर्णपणे स्वच्छ होतील.
