काही नेहमीचे जिन्नस वापरून तुम्ही घरी टोनर तयार करू शकता. ग्रीन टी, कोरफड, गुलाबपाणी, काकडीचा वापर करुन टोनर कसा तयार करायचा समजून घेऊया.
Skin Care : हिवाळ्यातही चेहरा करेल ग्लो, आहारातले बदल ठरतील महत्त्वाचे
ग्रीन टी - बहुतेक घरांमधे ग्रीन टी उपलब्ध आहे. याचा वापर घरगुती टोनर बनवण्यासाठी देखील करू शकता. ग्रीन टी पाण्यात चांगलं उकळवा आणि थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत ओता. आता हे पाणी चेहऱ्यावर शिंपडा, यामुळे त्वचा फ्रेश राहिल. या टोनरमुळे चेहऱ्यावरची छिद्र घट्ट राहतील. ग्रीन टीमधे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
advertisement
कोरफड - कोरफड त्वचेसाठी वरदान मानली जाते. कोरफड टोनर बनवण्यासाठी, अर्धा कप पाण्यात दोन चमचे कोरफड गर मिसळा. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा, टोनर तयार आहे. हा टोनर चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा हायड्रेट होते, मऊ आणि चमकदार राहते.
Health Tips : नवीन वर्षासाठीचा वेट लॉस मंत्रा, वजन कमी करण्यासाठी हेल्थ टिप्स
गुलाबजल आणि काकडी - गुलाबजल आणि काकडी वापरून घरी टोनर देखील बनवू शकता. काकडी किसून घ्या आणि त्याचा रस काढा. नंतर, ते समान प्रमाणात गुलाबजलात मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता. यामुळे चेहरा मॉइश्चरायझ होईल आणि कोरडेपणा दूर होईल.
लिंबू - घरी लिंबू टोनर बनवण्यासाठी, प्रथम अर्धा चमचा लिंबाचा रस एक ग्लास पाण्यात मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता. ते लावल्यानं चेहरा खोलवर स्वच्छ होतो आणि उजळतो.
