इंद्रायणी नदीच्या पात्रात भेगडीवाडीमध्ये कुंडमळाध्ये रांजणखळगे आहेत. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असून मन प्रसन्न करतो. बारा ही महिने तुडुंब भरलेले इंद्रायणी नदीचे पात्र, बंधाऱ्यावरून कोसळणारे पाणी, इंद्रायणीच्या दोन्ही काठांवरील नयनरम्य दाट झाडी, नदीपात्रातील बदक आणि पाणकोंबड्यांचे थवे, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट, खाली नदीपात्रामध्ये कुंडजाई मातेचं सुंदर मंदिर असा डोळ्याचं पारणं फेडणारा हा परिसर आहे. नदीपात्रातल्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक इथं येतात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिलीय.
advertisement
स्वस्त आणि मस्त खरेदीसाठी मुंबईतले 5 फेमस स्ट्रीट मार्केट
कुंडमळाला कसं जायचं ?
मुंबई - पुणे जुने महामार्गावर तळेगाव दाभाडेजवळील घोरावडेश्वर डोंगराच्या अगदी समोरील मार्गाने कुंडमळाकडे रस्ता जातो . जवळच बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. येथून अगदीच दोन किमी अंतरावर कुंडमळा आहे. त्यामुळे बहुतांश पर्यटक बेगडेवाडी रेल्वे स्टेशन पासून चालतच कुंडमळाकडे येतात.
नाश्ताच्या खर्चात खरेदी करा कपडे, पुण्यात इतकं स्वस्त कुठंच नाही
पुण्याहून कुंडमळा हे जवळपास 30 किलोमीटर तर लोणावळ्याहून 37 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे स्वत:ची गाडी घेऊन देखील इथं तुम्हाला जाता येईल.