नाश्ताच्या खर्चात खरेदी करा कपडे, पुण्यात इतकं स्वस्त कुठंच नाही

Last Updated:

पुण्यात अगदी एका नाश्ताच्या खर्चात कपडे मिळण्याच्या एका ठिकाणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

News18
News18
पुणे, 13 सप्टेंबर : तरुणाईचं शहर अशी पुण्याची ओळख आहे. पुणे शहरातल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जगभरातले विद्यार्थी शिकतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या पॉकेटमनीला आकर्षित करतील अशी अनेक रेस्टॉरंट्स आणि दुकानं पुण्यात आहेत. कमी पैशांमध्ये चांगली शॉपिंग करण्यासाठी पुण्यातले वेगवेगळे भाग प्रसिद्ध आहेत. बाहेरच्या जगात महागाई वाढली असली तरी इथं स्वस्तातच कपडे मिळतात. पुण्यात अगदी एका नाश्ताच्या खर्चात कपडे मिळण्याच्या एका ठिकाणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुण्यातल्या ऐतिहासिहक फर्ग्युसन कॉलेजचा रस्ता अर्थात एफसी रोड हा तरुणाईचा शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो. गुडलक कॅफे पासून ते फर्ग्युसन कॉलेजच्या शेवटच्या गेटापर्यंतचा हा रस्ता दिवसभर तरुणाने गजबजलेला असतो. या रस्त्यावर पुण्यातलं स्वस्त मार्केट आहे. या मार्केटमध्ये अक्षरश: 20 ते 50 रुपयांच्या रेंजमध्ये टॉप मिळतात. त्याची क्वालिटी देखील चांगली असते. त्यामुळे तरुणांची इथं नेहमी खरेदीसाठी गर्दी होते.
advertisement
या मार्केटमध्ये केसाचे हेअर बँड, क्लिप, ब्रेसलेट, कानातल्या रिंग्स, नोज रिंग विविध ज्वेलरीचे प्रकार, कपड्यांमध्ये वेस्टर्न आऊटफिट, इंडियन आऊटफिट, इंडो वेस्टन पद्धतीचे आऊटफिट्स, विविध प्रकारचे चप्पल, सॅंडल मिळतात. प्रत्येक ऋतूनुसार विविध कपड्यांची नवनवीन फॅशन प्रत्येक आठवड्याला येथे बदलत असते.
advertisement
'मी या रस्त्यावर केसांच्या क्लीपपासून ते पायातल्या शूजपर्यंतच्या सर्व वस्तू 500 रुपयांमध्ये खरेदी करते. 50 रुपयांमध्ये टॉप, 150 रुपयांमध्ये चप्पल इथं मिळते. तसंच ज्वेलरी देखील स्वस्त आहे. शॉपिंग झाल्यानंतर काहीतरी चटपटीत खाण्यासाठीही या रोडवर अनेक पर्याय आहेत. त्यामुळे एफसी रोड ही आमची आवडती जागा आहे, असा अनुभव काजल या पुणेकर तरुणीनं सांगितला.
advertisement
आमच्या संपूर्ण मार्केटमध्ये दिल्ली, लुधियाना, मुंबई, पंजाब तसेच बाहेर देशातून देखील मार्केटमध्ये विविध वस्तू विक्री उपलब्ध असतात. इथं तरूणाईची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे आणलेला माल लवकरात लवकर संपतो आणि यामुळे आम्हाला स्वस्तामध्ये वस्तू विकणे परवडते. पुण्यातले कॉलेज या रोडच्या जवळ असल्यानं तरुणांची इथं नेहमी गर्दी असते. तसंच शनिवार-रविवारी सुट्टी असलेला नोकरदार वर्ग इथं खरेदीसाठी येतो. त्यामुळे इथं नेहमी गर्दी असते, असा अनुभव येथील विक्रेते समीर यांनी सांगितला.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
नाश्ताच्या खर्चात खरेदी करा कपडे, पुण्यात इतकं स्वस्त कुठंच नाही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement