शहरातील एकूण 9 मार्गावर रोप वे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी पाच प्रमुख मार्गामध्ये कांदिवली-गौराई, मुलुंड-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, भाईंदर एस्सल वर्ल्ड, बोरीवली-एस्सल वर्ल्ड किंवा गोराई, घाटकोपर-घणसोली या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय तळोजा-माथेरान, नेरळ-माथेरान, दहिसर पावणे आणि नरिमन पॉइण्ट शिवाजी पुतळा या मार्गांवर रोप वे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
एका चार्जिंगमध्ये 500 किमी धावणार, मुंबई ते रत्नागिरी, धुळ्यापर्यंत करा नॉनस्टॉप प्रवास
advertisement
रोपवेचे मार्ग कोणते :
• कांदिवली-गोराई (6 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 1 तास
रोप वे झाल्यास - 15 मिनिटे
• भाईंदर एस्सल वल्र्ड (9 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 40 मिनिटे
रोप वे झाल्यास - 16 मिनिटे
• घाटकोपर-घणसोली ( 12 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 1 तास
रोप वे झाल्यास - 30 मिनिटे
• तळोजा-माथेरान (15 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 2 तास
रोप वे झाल्यास - 30 मिनिटे
• नेरळ-माथेरान (7 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 40 मिनिटे
रोप वे झाल्यास - 15 मिनिटे
• बोरीवली-एस्सल वर्ल्ड किंवा गोराई (5 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 1 तास
रोप वे झाल्यास - 12 मिनिटे
• मुलुंड-संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (12 किमी)
सध्याचा प्रवास वेळ - 90 मिनिटे (दिड तास)
रोप वे झाल्यास - 30 मिनिटे
• दहिसर - पावणे (5 किमी)
• नरिमन पॉइण्ट - शिवाजी पुतळा (2 किमी)