छत्रपती संभाजीनगर वनविभाग अंतर्गत खुलताबाद वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वेरूळ येथील महादेव वन उद्यान आहे. हे उद्यान एकूण पाच हेक्टरमध्ये आहे. वेरूळ येथे लेणी, घृष्णेश्वर मंदिर, कैलास लेणे आहे, त्या अनुषंगाने वनविभागाची देखील महादेवाच्या नावाचे अध्यात्मिक, निसर्गरम्य वन असावे, या प्रकारची संकल्पना होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे वनविभाग अधिकारी संदीप मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
advertisement
Navratri 2025: तुळजाभवानी घेणार विश्रांती! आजपासून सुरू होणार देवीची मंचकी निद्रा
'महादेव' वन उद्यानात महादेवाला आवडणारी पांढरी फुले, चाफा, पारिजातक, रातराणी, मोहा, गुलमोहर यासह बेलवन, तीन पानी बेल, पाच पानी बेल, रुद्राक्षाची झाडे आहेत. तसेच बांबूची झाडे आणि यासारख्या विविध प्रकारच्या फुलांच्या झाडांची लागवड येथे करण्यात आली आहे.
घृष्णेश्वर, लेणी या ठिकाणाहून दर्शन घेऊन तसेच प्रवास करून आल्यानंतर पर्यटक कुठेतरी विसावा मिळावा म्हणून या 'महादेव वन उद्यानात' येतात, भोजनाचा आस्वाद घेतात. तसेच पर्यटकांना झाडांची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक झाडाच्या बाजूला माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच या उद्यानात' पंचमुखी, एकमुखी आणि त्रिमुखी शिवमूख, त्रिशूल, डमरू, ओंकार, नंदी, गणेश, पार्वती, कार्तिकेय, गंगा, रुद्राक्ष, कमळ सरोवर अशा बारा आकर्षक मूर्ती उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील मोरे यांनी दिली.