दुर्गाडी किल्ला: किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता. याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाते. दुर्गाडीच्या लहानशा किल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांची नेहमी गर्दी बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कल्याण जिंकले. तेव्हा तिथे त्यांनी नौदलासाठी दुर्गाडी किल्ला बांधला. मंदिराजवळ गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहे.
advertisement
मेट्रो जंक्शन मॉल: कल्याणमधील मेट्रो जंक्शन मॉल हा ठाणे जिल्ह्यातील पहिला शॉपिंग मॉल आहे, जो कल्याण-शिळ रोडवर नेतिवली येथे आहे. या मॉलची स्थापना एप्रिल 2008 मध्ये झाली आणि याचे क्षेत्रफळ सुमारे 550,000 चौरस फूट आहे. येथे खरेदीसाठी अनेक दुकाने, फूड कोर्ट आणि मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर भागातील लोकांचं हे आवडीचं ठिकाण आहे.
काळा तलाव: कल्याणमधील 'काळा तलाव' हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, ज्याला 'शेनाळे तलाव' असेही म्हणतात. हा कल्याणमधील पहिला आणि सर्वात जुने सार्वजनिक तलाव आहे, जो पर्यटकांसाठी बोटिंग, चालणे आणि पिकनिकसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. याचा इतिहास 18 व्या शतकापर्यंत जातो, जेव्हा आदिलशहाने हा तलाव बांधला होता.
बिर्ला मंदिर: शहाड येथून कल्याण मुरबाड रोडवर बिर्ला मंदिर आहे. बिर्ला मंदिर कल्याण स्टेशनपासून 4 किमी आणि शहाड पासून 1 किमी अंतरावर आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक ठिकाणांहून भाविक या मंदिराकडे दर्शनाला येत असतात.
दरम्यान, कल्याणमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणे असून दिवाळीच्या सुट्टीत एक-दोन दिवसांचा प्लॅन असेल तर या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.