सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी कशी घ्यावी?
पावसाच्या सरी जोरात असताना नद्यांजवळ, धबधक्यांजवळ किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळा. डोंगराळ भागात भूस्खलनाची शक्यता अधिक असते, त्यामुळे घाटात गाडीने जाताना काळजी घ्या. मोबाईल नेटवर्क नसलेल्या ठिकाणी जाताना घरच्यांना किंवा मित्रांना आधीच माहिती द्या. हवामान खात्याचा अंदाज बघूनच सहलीचं नियोजन करा.
Monsoon Recipe: पावसाळ्यात गरमागरम खायला हवंच, बनवा कुरकुरीत अशी बांगडी भजी, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
अतिवृष्टी होणारे भाग कोकणातील काही धबधबे, भातसा धरण परिसर घसरट डोंगरदऱ्या आणि अरुंद घाटमार्ग विशेषतः सह्याद्रीतील काही ट्रेकिंग पॉइंट्स. गर्दीची ठिकाणं जिथे आपत्कालीन मदत मिळणं कठीण होऊ शकतं अशा ठिकाणी जाऊ नये, असं अनुभवी ट्रेकर दिवाकर साटम सांगतात.
फिरायला जाताना तुमच्याकडे या वस्तू असायलाच हव्यात
पाणीरोधक रेनकोट आणि बॅग कव्हर पावसाच्या जोरदार सरींपासून स्वतःसह तुमच्या साहित्यानं सुरक्षित राहण्यासाठी असायला हव्यात. डोंगराळ आणि ओले रस्ते पार करताना पकड चांगली मिळावी म्हणून भक्कमव घसरणार नाहीत असे शूज हवेत. टॉर्च (अत्यावश्यक) जंगलात किंवा कमी प्रकाशाच्या ठिकाणी अंधारात अडचण येऊ नये असायला हवी. प्राथमिक उपचार पेटी (फर्स्ट-एड किट) किरकोळ जखम, कीटक चावणे किंवा थकवा यासाठी पाहिजेत.
ओळखपत्र आणि काही रोख रक्कम आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पढेल म्हणून पॉवर बँक मोबाइलचे नेटवर्क कमी असले तरी फोन सतत चालू ठेवण्याची गरज असते. सुकवलेले खाण्याचे पदार्थ (बिस्किटं, ड्रायफ्रुट्स) अनपेक्षित अडथळा आल्यास उर्जेचा स्रोत. पाण्याची बाटली व पाण्याचे टॅबलेट्स (किंवा फिल्टर) स्वच्छ पाणी मिळेलच याची खात्री नसते. प्लॅस्टिक पिशव्या भिजू नये अशा वस्तू ठेवण्यासाठी घ्यावयात तसेच कचरा गोळा करण्यासाठी एक छोटी पिशवी सोबत ठेवावी. ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल.
पावसाळा निसर्गाचा उत्सव असला, तरी आनंदात सुरक्षिततेचं भान ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. योग्य माहिती, योग्य तयारी आणि जबाबदारीनं वागणं हाच खऱ्या अर्थानं पावसाळ्याचा आनंद घेण्याचा मार्ग आहे.