10 दिवसांची आध्यात्मिक यात्रा नाशिकहून
IRCTC आयोजित श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा 7 नोव्हेंबरला नाशिकहून सुरू होणार आहे आणि 16 नोव्हेंबरला संपेल. तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी प्रवाशांनी तिकिटे स्वतंत्रपणे ऑनलाइन बुक करणे आवश्यक आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्यांसाठी नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर आणि कलबुर्गी येथे बोर्डिंग सुविधा उपलब्ध असून, प्रवास सोयीस्कर आणि आरामदायक व्हावा याची खास काळजी घेण्यात आली आहे.
advertisement
Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठं? पाहा वेळापत्रक
यात्रेतील दर्शन स्थळे
या 10 दिवसांच्या यात्रेत प्रवाशांना दक्षिण भारतातील अनेक प्रसिद्ध तीर्थस्थळांचे दर्शन घेता येईल. यात्रेची सुरुवात तिरुपती येथून होऊन येथे लार्ड वेंकटेश्वरन स्वामी मंदिर आणि पदमावती मंदिराचे दर्शन घेतले जाईल. त्यानंतर रामेश्वरममध्ये रामनाथस्वामी मंदिर आणि धनुष्कोडी येथे भेट देण्यात येईल. मदुराई येथे मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारीमध्ये विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम आणि कन्याकुमारी मंदिर तसेच तिरुवनंतपुरममध्ये पद्मनाभस्वामी मंदिर आणि कोवलम बीच या ठिकाणी जाता येईल. या यात्रेत प्रवाशांना केवळ धार्मिक अनुभवच नाही तर दक्षिण भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख देखील पाहायला मिळणार आहे.






