बळवंत सांगळे हे कोल्हापूरच्या पाचगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ दुर्गभ्रमंतीकार आहेत. त्यांनी बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात नोकरी मिळवली होती. कष्टाने पदोन्नती मिळवत ते उपअभियंता पदावर कार्यरत होते. पण शेवटी आपल्या दुर्गभ्रमंतीची आवडीमुळे त्यांनी निवृत्तीच्या 2 वर्ष आधीच स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर गड किल्ल्यांवरचा प्रवास अगदी स्वच्छंदपणे सुरू ठेवला असल्याचे सांगळे सांगतात.
advertisement
भारतातील हे प्रसिद्ध किल्ले पाहिलेत का? छायाचित्रातून घ्या दुर्गदर्शन
सांगळे यांनी अखंड 48 वर्षे जंगलभ्रमंती आणि दुर्गभ्रमंती केली आहे. 1970 ते 1975 अशी पाच वर्षे त्यांनी आपली जंगलभ्रमंती पूर्ण केली. तर 1975 सालापासुन आजतागायत त्यांचा दुर्गभ्रमंतीचा प्रवास सुरु आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सर्व गड किल्यांची भटकंती पूर्ण केली आहे. तर सह्याद्री मधील 200 हून अधिक व दक्षिण भारतातील सर्व किल्ल्यांवरील भटकंतीचा प्रवास त्यांनी एकट्यानेच पूर्ण केला आहे.
म्हणून एकट्याने केले किल्ले सर..
बळवंत सांगळे हे बऱ्याच ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुप सोबत फिरले आहेत. सुरुवातीला त्यांनी 1975 साली जोतिबा पन्हाळा ते पावनखिंड असा पहिला ट्रेक केला होता. पुढे 10-12 दिवसांचे अनेक ट्रेक केल्यानंतर सह्याद्री बद्दल आकर्षण निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगळे यांनी सांगितले. 1990 पर्यंत ट्रेकिंग सांगळे हे गृपमधून सर्वांसह गड किल्ले पाहण्यास जात होते. त्यानंतर हळूहळू घरगुती आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढल्याने ग्रुपमधील सदस्यांची संख्या कमी होऊ लागली.
पन्नाशीपार कोल्हापूरकरांचं भारत दर्शन, सायकलवरून करणार तब्बल इतका प्रवास
पुढे आपल्याला एकट्याने ट्रेकिंग लागू शकते, हे ओळखून सांगळे यांनी ग्रुप सोबत ट्रेक करत करतच एकट्याने गड किल्ले पाहण्यास सुरुवात केली. असे त्यांनी तब्बल 12 वर्ष ट्रेकिंग केले. त्यानंतर एका ट्रेकवेळी त्यांना असे लक्षात आले की, स्वतःची गाडी घेऊन बरेच जण येतात आणि त्यामुळे प्रवासाचा वेळही वाचतो. त्यामुळे त्यांनी एकट्याने मोटर सायकल घेऊन गड किल्ल्यांची भ्रमंती करण्यास सुरुवात केली. पुढे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील सर्व किल्ले सांगळे यांनी मोटर सायकलवरून फिरून पाहिले आहेत. तर उत्तर भारतातील सर्व किल्ले त्यांनी चार चाकी गाडीतून जाऊन पाहिले आहेत.
दरम्यान, आपल्या 48 वर्षांच्या दुर्ग भ्रमंतीच्या मोहिमांमधून सांगळे यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे भारतातील तब्बल 1100 च्या वर गडकिल्ले पाहून त्यातील कित्येक ठिकाणची उत्कृष्ट छायाचित्रेही काढली आहेत. या छायाचित्रांचे विविध ठिकाणी प्रदर्शनही होत असते.