भारतातील हे प्रसिद्ध किल्ले पाहिलेत का? छायाचित्रातून घ्या दुर्गदर्शन

Last Updated:
भारतातील काही ऐतिहासिक किल्ले आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचे दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी टिपलेले खास फोटो इथं पाहा.
1/10
 महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक ऐतिहासिक गड किल्ले आहेत. दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्या संपूर्ण भारतातील गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन  भरले. यात नागरिकांना देशभरातील बरेचसे किल्ले एकाच ठिकाणी पाहता आले.
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात अनेक ऐतिहासिक गड किल्ले आहेत. दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्या संपूर्ण भारतातील गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कोल्हापुरात भरले. यात नागरिकांना देशभरातील बरेचसे किल्ले एकाच ठिकाणी पाहता आले.
advertisement
2/10
यामुळे आपल्या देशात किती वैविध्यपूर्ण पद्धतीने ऐतिहासिक गड किल्ल्यांची बांधणी झाली आहे, याची प्रचिती येते. यामध्ये तब्बल 256 वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग अशा किल्ल्यांची छायाचित्रे आहेत.

3/10
त्यापैकी एका छायाचित्रात तामिळनाडू राज्यात वेल्लोर जिल्ह्यातील वेल्लोर किल्ला पाहायला मिळतो. तसेच या छायाचित्रात दिसणाऱ्या साजरा, गोजरा आणि लाजरा या तीन किल्यांच्या त्रिकुटांपैकी साजरा या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील आहे.

4/10
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील चित्रदुर्ग हा भारतातील क्षेत्रफळाने मोठा असणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे. तर अनेक अवशेषांसह रावणाची बहिण असलेल्या शुर्पनखा हिचेही मंदिर किल्ल्यावर असल्याचे जाणकार सांगतात.

5/10
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात बदामीची लेणी आपल्याला सर्वांना परिचित आहेत. पण याच बागलकोट जिल्ह्यात बदमीचा किल्लाही आहे.

6/10
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. त्यांपैकी अणकाई आणि तणकाई या दोन किल्ल्यांपैकी अणकाई किल्ल्याचे छायाचित्र पाहायला मिळते. याठिकाणी अनेक मुर्त्या, लेणी आणि अवशेष पाहायला मिळतात.

7/10
मध्यप्रदेशमध्ये देखील सुंदर ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात. त्यात जबलपूर जिल्ह्यात राणी दुर्गावती किल्ला हा एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीवेळी चक्क एका मोठ्या दगडाचा वापर किल्याचा मुख्य भाग म्हणून करण्यात आला आहे.

8/10
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका करवून घेऊन शिवपुरी घाटीतून गेल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्याच मार्गाच्या जवळ शिवपुरी जिल्ह्यात नरवरचा प्रसिद्ध किल्ला पाहायला मिळतो.

9/10
सध्या भारतात गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या दीव दमण या भागात देखील अतिशय सुंदर किल्ले आहेत, जे दुर्गप्रेमींना आकर्षित करत असतात.

10/10
राजस्थान राज्यातील राजसमंद जिल्ह्यात असणारा कुंभलगढ हा देखील एक अनोखा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत ही चीनच्या भिंतीनंतर दुसरी सर्वात लांब अखंड भिंत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement