TRENDING:

Shegaon Best Places : शेगावला फिरायला जाताय? या निसर्गरम्य ठिकाणाला द्या भेट, एकदा Video पाहाच

Last Updated:

महाराज्यांच्या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर शेगावमधील विविध ठिकाणी सुद्धा भाविक दर्शनासाठी जातात. त्यातीलच एक म्हणजे कृष्णाजीचा मळा. शेगावला गेलेत आणि महाराजांच्या या प्रचिती स्थळाला भेट दिली नसेल तर नक्की भेट देऊन बघा. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : विदर्भातील सर्वात प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ म्हणून शेगावची ओळख आहे. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज कित्येक भाविक शेगावी येतात. महाराजांच्या मंदिराचे दर्शन झाल्यानंतर शेगावमधील विविध ठिकाणी सुद्धा भाविक दर्शनासाठी जातात. त्यातीलच एक म्हणजे कृष्णाजीचा मळा. शेगावला गेलेत आणि महाराजांच्या या प्रचिती स्थळाला भेट दिली नसेल तर नक्की भेट देऊन बघा. निसर्गरम्य वातावरणात कृष्णाजींचा मळा हे निसर्गरम्य ठिकाण आहे. महादेवाची पिंड, रंगबिरंगी फुलझाडे आणि विसावा घेण्यासाठी उत्तम जागा आणि निसर्ग रम्य वातावरण त्याठिकाणी आपल्याला बघायला मिळते.
advertisement

तेथील आख्यायिका नेमकी काय?

तेथील पुजारी सांगतात की, कृष्णाजीचा मळा या ठिकाणची एक आख्यायिका आहे. हा मळा कृष्णाजी पाटील आणि रामचंद्र पाटील यांचा आहे. याठिकाणी श्री संत गजानन महाराज काही दिवस वास्तव्यासाठी होते. त्यावेळी ब्रम्हगिरी गोसावी आणि त्यासोबत त्याचे सहकारी नेमके गजानन महाराज कोण आहेत? हे बघण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना जळत्या पलंगावर बसून आपली प्रचिती दिली. तेच ठिकाण म्हणजे हा कृष्णाजीचा मळा होय.

advertisement

सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 जूनपासून नवे नियम, एक चूक पडेल महागात

View More

येथील विशेषतः काय?

कृष्णाजीचा मळा हे संत गजानन महाराजांनी वास्तव्य केलेले ठिकाण आहे. तिथे पुरातन अशी महादेवाची पिंड आहे. त्याठिकाणी आता सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. या पिंडीची स्थापना संत गजानन महाराजांनी केली आहे, असे तेथील नागरिक सांगतात. त्याचबरोबर गजानन महाराजांची भव्य अशी प्रतिमा देखील तिथे आहे. कृष्णाजीचा मळा या ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती आणि फोटो आपल्याला तेथील भिंतीवर बघायला मिळते. त्यावरून आपण तेथील संपूर्ण माहिती घेऊ शकतो.

advertisement

या ठिकाणचे विशेष म्हणजे निसर्ग रम्य वातावरण. याठिकाणी पाऊल ठेवताच हिरवीगार झाडे बघायला मिळतात. अतिशय जुने असे वडाचे झाडं देखील तिथे आपल्याला बघायला मिळते. संत गजानन महाराज या झाडाखाली नेहमी बसत असल्याचे देखील तेथील नागरिक सांगतात. त्या झाडाखाली आराम करण्यासाठी आणि विसावा घेण्यासाठी जागा आहे. फोटो प्रेमींसाठी अतिशय सुंदर असे दृश्य येथे आहे. शेगावला आलात तर या ठिकाणी नक्की भेट देऊन बघा. श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर हे ठिकाण आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Shegaon Best Places : शेगावला फिरायला जाताय? या निसर्गरम्य ठिकाणाला द्या भेट, एकदा Video पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल