सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 जूनपासून नवे नियम, एक चूक पडेल महागात
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Sinhagad Fort: जून महिन्यापासून सिंहगडावरील पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे. या काळात गडावर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. वनविभागाने पर्यटकांसाठी नवी नियमावली जाहीर केलीये.
पुणे: किल्ले सिंहगडावर पर्यटक आणि शिवप्रेमींची नेहमीच वर्दळ असते. जूनपासून सिंहगडावरील पर्यटानाचा हंगाम सुरू होत आहे. मात्र, सिंहगडावर जाण्यापूर्वी आता नवी नियमावली पाहावी लागणार आहे. वनविभागाने सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली असून 1 जूनपासून हे नवे नियम लागू केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.
सिंहगडावर प्लास्टिक बंदी
किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सिंहगडावर प्लास्टिक बंदीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वनविभागाने सिंहगडावर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून ही बंदी अमलात येणार आहे. गडावर जाणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागेल. गडावरून परत येताना, कुठेही प्लास्टिकचा कचरा फेकताना आढळल्यास पर्यटकांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.
advertisement
जूनपासून सिंहगडावरील पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे. वन विभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी रविवारी दुपारी गडावरील विक्रेत्यांची बैठक घेतली. यावेळी पुढील आठ दिवसात प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्याची मुदत विक्रेत्यांना देण्यात आली आहे.
advertisement
अतिक्रमण हटवणार
पुणे जिल्ह्यातील सिंहगडासह सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.
Location :
Pune Cantonment (Pune Camp),Pune,Maharashtra
First Published :
May 20, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 जूनपासून नवे नियम, एक चूक पडेल महागात